जालना । प्रतिनिधी – तालुक्यातील मौजपुरी येथील रामेश्वरी मंदिरामध्ये 101 वे फिरते पारायण सोहळ्यानिमित्त ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बारड यांच्या गाथा पारायण व कीर्तनास भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी भेट दिली, याप्रसंगी रामेश्वरी मंदिर कमिटीच्या वतीने दानवे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
जालन्यामधून 28 गावांनी यात सहभाग घेतला असून 250 हून अधिक लोक परायणास बसले आहेत. उपस्थित सर्व भाविक भक्तांना भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्यावतीने सफरचंद व केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या गाथा पारायण सोहळ्याप्रसंगी भागवत बावणे, कपिल दहेकर, वसंत शिंदे, बद्रीनाथ भसांडे, निवृत्ती गायकवाड, निवृत्ती लंके, राम जाधव, विष्णू डोंगरे, मुकेश चव्हाण, कैलास उबाळे, गोवर्धन कोल्हे, रामजी शेजुळ, गोपाल चौधरी, रामदास गायकवाड, दत्ता जाधव, सत्यनारायण ढोकळे, हरिभाऊ गोरे आदींसह मोठ्या संख्येने भाविक-भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.