गांज्याची अवैध वाहतुक करणार्‍या इसम कारसह ताब्यात; पोलीस ठाणे हसनाबाद यांची कारवाई

4

जालना । प्रतिनिधी – जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणार्‍यावर कारवाई करण्याची मा. पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल साहेब यांनी कारवाई करणे बावत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही व आमचे अधिपत्याखाली नेमणुकीस असलेले दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणारे इसमांची माहीती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले.
त्याअनुषंगाने दिनांक 19/10/2024 रोजी आम्ही पोलीस ठाणे हजर असतांना आम्हाला आमचे गुप्तबातमीदार यांचे मार्फतीने माहीती मिळाली की, मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गांज्याची अवैध पणे स्वतःचे आर्थीक फायदयासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने सिल्लोड वरुन कायगांव मार्गे हसनाबाद कडे एक टाटा इंडीगो कार मध्ये अवैध गांज्या घेवुन जात असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली. त्यांनतर आम्ही सदर माहीती मा.पोलीस अधिक्षक सो जालना, मा.अपर पोलीस अधिक्षक सो जालना, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो भोकरदन यांना फोनव्दारे देवुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली गोषेगांव ते हसनाबाद रोडने नायब तहसिलदार, पंच, आवश्यक साहीत्यासह सापळा रचला असता गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या माहीती प्रमाणे टाटा इंडीगो कंपनीची पांढर्‍या रंगाची कार दिसुन आली. सदर कार क्रमांक चक 12 घछ 7598 हिस थांबवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नारायण कृष्णा इंगळे वय 23 वर्षे रा. सिरंसगांव वाघुळ ता.भोकरदन जि.जालना असे सांगीतले त्यानंतर पंच व नायब तहसिलदार श्री. पप्पुलवाड यांचे समक्ष झडती घेतली असता त्यामध्ये 87 किलो 400 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांज्या मिळुन आला सदर आमली पदार्थची किंमत 21 लाख 85 हजार रुपये व कारची किंमत 4 लाख 50 हजार असे एकुण 26 लाख 35 हजार रुपयाचा माल मिळुन आला सदरचा गांज्या हा इसम नामे नारायण कृष्णा इंगळे वय 23 वर्षे रा. सिरंसगांव वाघुळ ता. भोकरदन जि. जालना हा अवैध रित्या घेवुन जात असतांना मिळुन आला. सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक श्री फकीरचंद फडे यांनी फिर्याद देवुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास श्री. संजय आहिरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.अजय कुमार बंन्सल, पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक मा.डॉ. गणपत दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन यांचे मार्गदर्शनाखाली संजय आहिरे सहा. पोलीस निरीक्षक हसनाबाद पो.स्टे., फकरीचंद फडे पोउपनि हसनावाद, पोहेकॉ सागर देवकर, पोहेकॉ भरतकुमार चौधरी मपोहेकॉ कल्पना बोडखे, पोकॉ निलेश खराट, पोकॉ प्रकाश बोर्डे, पोकॉ दिपक सोनुने, पोकॉ योगेश पाटीलपाईक, पोकॉ नितेश खरात, पोकॉ सुरेश डुकरे यांनी केलेली आहे.