सायबर भामट्यांपासून सावध रहा, सायबर शाखाचे प्रभारी पोनि गुणाजी शिंदे यांचे आवाहन

9

जालना । प्रतिनिधी – दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर भामट्यांपासून सावध राहावं असं आवाहन जालना सायबर पोलिसांनी केलंय. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सायबर भामटे नगरिकांना खरेदीच्या आकर्षक जाहिराती दाखवून त्यांना भुरळ पाडून त्यांची फसवणूक करू शकतात.
सायबर शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक गुणाजी शिंदे यांनी आज दि.19 शानिवार रोजी दुपारी साडेबारा वा. दम्यान सायबर गुन्हेगारी विषयी जिल्ह्याभरातील नागरीकांना अवाहन केले.
सध्या सणावाराचे दिवस असून आगामी काही दिवसात दिवाळी हा महत्त्वाचा सण येत आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत आकर्षक आफर च्या माध्यमातून जाहिरातीं दिल्या जातात त्यातच काही सायबर गुन्हेगारांच्या वतीने फसवणुकीचे प्रकार घडत असतात त्यामुळे अनोळखी किंवा फसवणूक करणार्‍या कोणत्याही ऑनलाईन लिंक वर ग्राहकांनी संपर्क साधू नये तसेच फसवणूक करणार्‍या लिंक शेअर करू नये,आपले बँक अकांऊटच्या डिटेल अशा लिंक वर टाकू नये असे अवाहन सायबर चे प्रभारी पो.निरि. गुणाजी शिंदे यांनी केले आहे.