जालना । प्रतिनिधी – शिवसेना हा पक्ष नेहमीच वंजारी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून भविष्यातही राहील, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळेच आपण देखील वंजारी समाज भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना दिली.
जुना जालना भागातील भगवान सेवा मंडळाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात श्री. खोतकर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मेघराज चौधरी यांची विशेष उपस्थित होती. तर या कार्यक्रमासाठी अशोकराव आघाव, गतत घुगे, मुरलीधर काकड, राजेंद्र राख, डॉ. चौरे, भगवान सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीमंतराव मिसाळ, गजानन गिते, विजयकुमार वाघ, मधुराज डोईफोडे, महादेव आघाव, के. पी. विघ्ने, विलास जायभाये, बंडु इघारे, उध्दवराव जायभाये, बाबासाहेब गिते, शेषराव वाघ, ओमप्रभू नागरे, दिपक दराडे, भगवानराव गिते, संदीप घुले, ब्रम्हा वाघ, काळुसे सर, सुखदेव नागरे, अॅड. मधुकरराव सोनुने, इंजि. हुसे, कैलास हजारे, गणेश घुगे, अॅड. राजेश वाघ, पालवे, प्रकाश जायभाये, योगेश घुगे, वाघ, मयुर भताने, शिवाजी वाघ आदींची उपस्थिती होती.
वंजारी समाज भवनासाठी जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने बोलतांना श्री. खोतकर पुढे म्हणाले की, वंजारी समाजासाठी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ व्हावे, अशी मागणी नुकतीच जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी माझ्याकडे केली होती. याची दखल घेऊन आपण समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली व मुख्यमंत्री महोदयांनी त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर जालना येथे खा. श्रीकांत शिंदे आले असता भाऊसाहेब घुगे यांच्या विनंतीवरुन वंजारी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची बैठक घडवून आणली. समाजाच्या महामंडळासह विविध मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. समाज भवनासाठी भाऊसाहेब घुगे यांच्या मागणीनुसार पहिल्यांदा पन्नास लक्ष रुपयांचा आणि नंतर ऐंशी लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, वंजारी समाजासाठी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वंजारी समाजासाठी महामंडळ व्हावे, याकरीता मी आपल्याकडे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व महामंडळ स्थापन होईपर्यंत समाजबांधवांना सोबत घेऊन पाठपुरावा करणार आहेह. जालना शहरामध्ये समाज बांधवांकरिता, गोरगरीबांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी एक सुसज्ज वस्तीगृह व्हावे, या करीता एक कोटीचा निधी मंजूर करावा, अशी मागणीही श्री. घुगे यांनी श्री. खोतकर यांच्याकडे केली व ती मंजूर करुन आणावी लागेल, तेवढा निधी देण्याचे आश्वासन श्री. खोतकर यांनी दिले.
यावेळी भगवान सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीमंतराव मिसाळ, अध्यक्ष राजेंद्र राख यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. जगत घुगे यांनी केले. यां कार्यक्रमास शिवसैनिकांसह वंजारी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.