परतुर विधानसभा मतदारसंघाला आरोग्य सुविधेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न – लोणीकर

9

परतूर । प्रतिनिधी – गेली अनेक वर्षांपासून परतूर व परिसरात आरोग्या बाबतच्या सुविधेंचा अभाव होता. मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात जनसामान्यांचे आरोग्य चांगले रहावे, याकरीता राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने प्रयत्न करून परतुर तालुकासाठी 60 कोटी रुपयांचे उपजिल्हा रुग्णालय तर मंठा तालुक्यासाठी स्वतंत्र 60 कोटी रुपयांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले असून लवकरच या उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा पातळीवरच्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे व परतुर विधानसभा मतदारसंघाला आरोग्य सुविधेच्या माध्यमातून परिपूर्ण बनवण्यासाठी आपला मानस असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.
मंठा व परतुर या दोन उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी 60 कोटी रुपये प्रमाणे 120 कोटी रुपये वाटूर आष्टी दहिफळ खंदारे ढोकसाळ श्रीष्टी व सातोना या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 6 कोटी 22 लाख रुपये प्रमाणे 37 कोटी 32 लाख रुपये तर खोराड सावंगी व उस्वद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी प्रत्येकी 55 लाख रुपये याप्रमाणे 1 कोटी 10 लाख रुपये निधी केंद्र सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे त्यासाठी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे मोठा पाठपुरावा केला होता अशी माहिती देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे
परतूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी आमदार लोणीकर यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले असून मतदारसंघात परतून मंठा व जालना या तीन तालुक्या त 14784 घरकुलांना मंजुरी देण्यात आले आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास मोदी आवास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना या घरकुलांच्या संबंधित योजनांचा समावेश आहे त्यामध्ये परतुर तालुक्यात 6349 (80 कोटी रुपये), मंठा तालुक्यातील 6961 (101 कोटी रुपये) व जालना तालुक्यातील 1484 (18 कोटी रुपये) अशा एकूण 14784 घरकुलासाठी 199 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून बहुतांश घरकुलांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे उर्वरित घरकुलांचा 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच प्राप्त होईल असे देखील यावेळी लोणीकरांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून परतून विधानसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यात 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यामध्ये अनेक गावांचा समावेश होऊन शेतकर्‍यांना समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात देखील परतून विधानसभा मतदारसंघातील 51 नवीन गावाची निवड करण्यात आली असून पात्र शेतकर्‍यांना आवश्यकतेनुसार विहीर शेततळे शेडनेट ट्रॅक्टर शेती अवजारे पेरणी यंत्र मळणी यंत्र रोटावेटर इत्यादी दिले जाणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.