भोकरदन । तडेगाव । प्रतिनिधी – भोकरदन शहरात दुभाजकावर झालेल्या अपघातात दोन दुचाकींचा समोरासमोर टक्कर झाली, ज्यामुळे एक व्यक्ती जागीच ठार झाली, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघाताच्या स्थळी तातडीने पोलीस आणि वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. जखमी व्यक्तीला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ही घटना शुक्रवार रोजी भोकरदन तालुक्यातील जालना रस्त्यावरील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर झाली मोटारसायकल मागुन येऊन धडकेत एक ठार तर अन्य एक जखमी झाला आहे सोपान राजू गोफने ( वय 22 रा तडेगाव ता भोकरदन) हे मयत झालेल्या युवकाचे नाव असून तर सागर साहेबराव दणके ( वय 20 रा तडेगाव ता भोकरदन) हे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे हा अपघात शुक्रवारी (दि . 18 ) सकाळी 10 वाजेदरम्यान झाला या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात त्याना तात्काळ जखमींना दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून सोपान राजू गोफने ह्यास मृत घोषित करण्यात आले .गंभीर जखमी असलेला सागर दणके ह्यास प्रथमोपचार देउन त्यास पुढील उपचारांसाठी जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठवण्यात आले अशी माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. सहाने यानी दिली. सोपान गाफने याच्या पश्चाताप आई वडील एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहेत. गावात हळहळ व्यक्त होत आहेत.