माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची जाफराबाद येथे बैठक

9

जाफराबाद – येथील शासकीय विश्रामगृह येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जाफराबाद तालुका अध्यक्ष अशोक म्हस्के यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करून नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थानी अशोक म्हस्के होते, या बैठकीला कार्यक्रमाची रूपरेषा माहिती अधिकार तालुका उपाध्यक्ष राम ससाणे यांनी सविस्तर सांगितली. माहिती अधिकाऱ व पत्रकार संरक्षण समिती टेंभुर्णी सर्कल प्रमुख अनिल छबुराव ससाने यांनी सुद्धा आपले विचार मांडले. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कार्य आणि पुढील वाटचालीचे नियोजन याबाबत सखोल अशी माहिती दिली. प्रत्येक सदस्यांना किंवा पदाधिकार्‍यांना ज्या कार्यालयात भ्रष्टाचार दिसेल तिथे माहिती अधिकार टाकल्यास त्यांना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी अशी ग्वाही दिली. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन राहिले पाहिजे असे करण्याचा निर्धार ठाम मांडला. बर्‍याच कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होत असतो त्याची शहानिशा करून तेथे माहिती अधिकारातून माहिती मागून त्या भ्रष्टाचारावर आळा बसवण्यात येत असतो. माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती याचा हे उद्देश म्हणजे यात पत्रकार सुद्धा असतात व ज्यांना पत्रकारी करायची नसते ते फक्त माहिती अधिकार यामध्ये काम करू शकतात. यामध्ये पत्रकार असो की माहिती अधिकाराचा सदस्य असो यांनी माहिती अधिकार एखाद्या कार्यालयात टाकल्यास, त्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती सदस्याला धमकी दिली असल्यास, त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातील माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती त्या सदस्याला पाठिंबा देऊन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिते. यामध्ये पत्रकार असतात पत्रकारांना सुद्धा एखादी बातमी लावल्यास पुढील व्यक्तीकडून पत्रकारास धमकी आल्यास त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रातील माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती त्या पत्रकाराला पाठीबा देऊन त्याच्या पाठीशी उभे राहिते.अशाप्रकारे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष अशोक म्हस्के यांच्या अध्यक्षनिय भाषणातून सांगण्यात आले. यावेळी बैठकीस उपस्थित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे जाफराबाद तालुका सचिव ज्ञानेश्वर निकाळजे, जाफराबाद महिला तालुका अध्यक्ष गोदावरी लेभे ,जाफराबाद तालुका उपसचिव गजानन फलफले, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे टेंभुर्णी सर्कल प्रमुख आनील ससाने, तालुका कार्यकारणी सदस्य दिनकर जंजाळ, जाफराबाद तालुका कार्यकारणी सदस्य सुरेश खंदाडे, दीपक चोतमल, सुनिल भाले, इत्यादी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा माहिती अधिकार तालुका उपाध्यक्ष राम ससाने यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड यांनी केले. त्यानंतर जाफराबाद तहसील कार्यालयाचे तहसीलदार सारिका भगत व जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची जाफराबाद कार्यकारणीची नावे व मोबाईल नंबर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जाफराबाद अध्यक्ष अशोक म्हस्के यांच्याकडून देण्यात आली आहे.