परतूर । प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाबद्दल घेतलेल्या ठोस भूमिकेला प्रभावित होऊन नुकताच मनमाड येथे रामप्रसाद थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत काहीही झाले तरी मी वंचित बहुजन आघाडी साठीच काम करणार असल्याचा शब्द उमेदवार रामप्रसाद थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला. ओबीसीची वज्रमुठ आणि एस.सी.,एस.टी. मायनॉरिटी,व्ही. जे.एन.टी.या समूहातील शोषित वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही असा ठाम विश्वास रामप्रसाद थोरात यांना व्यक्त केला आहे. त्यामुळे या सर्व समाजातील लोकांनी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रसंगी रोहन वाघमारे वंचितचे तालुकाध्यक्ष रवींद्र भदर्गे, परतूर शहराध्यक्ष राहुल नाटकर, मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव,डॉ. किशोर त्रिभुवन,चोखाजी सौंदर्य, गौतम खंडागळे, सुरमा सिंग, गुलाब दवंडे, जुनी,सिद्धार्थ कांबळे,लक्ष्मण वंजारे, सुरेश वाघमारे, आशिष मोरे, हनुमंत मोरे, दयानंद साळवे, शिवाजी डोळस, भारत उघडे, बाबासाहेब शिंदे, रंगनाथ वटाणे,आनंद गरड, पांडुरंग शेजुळ, पवन राशेनकर, शेषराव आढे तसेच वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.