जालना । प्रतिनिधी – शहरातील नूतन वसाहत आणि कैकाडी मोहल्ला भागात गुरुवार (दि 17) रोजी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या दोन ठिकाणी अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापे मारी करून दोन्ही ठिकाणी मिळून एकुण चार लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे रसायन व कच्चा माल पोलीसांनी नष्ट केले.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, आज दि.17 गुरूवार रोजी सकाळी 10 वा.च्या सुमारास नूतन वसाहत भिगात गावठी हातभट्टी चालक बिरजू आत्माराम कुमावत वय 40 वर्षे रा.नूतन वसाहत याच्या घरी छापेमारी करून स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख तेवीस हजार चारशे रू. चा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर लक्ष्मीबाई रमेश पवार वय 46 वर्षे रा. कैकाडी मोहल्ला यांच्या हातभट्टी अड्ड्यावर पोलीसांनी छापेमारी करून दोन लाख चार हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक 17 गुरुवार रोजी दुपारी एक वयाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली..
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंदत कुलकर्णी,
पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश उबाळे, पोहवा कांबळे, पोहवा हजारे, पोहवा लोखंडे, पोहवा गोशिक, पोहवा आडेप, पोना पटेल, पोकों चेके, पोकॉ भोसले, रमेश राठोड, पोहेकॉ रुस्तुम जैवाळ, पोहेकॉ जगदीश बावणे, पोहेकॉ संभाजी तनपुरे, मपोना चंद्रकला शउमल्लु, पोना सतीष श्रीवास, पोना देवीदास भोजणे, पोकॉ भागवत खरात, पोकॉ सोपान क्षीरसागर यांच्या वतीने कारवाई करण्यात आली.