मंठा – मंठा तालुक्यासह पंचक्रोशीत मागील तीस वर्षापासून वैद्यकीय सेवा देणार्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सेवा गौरव सोहळा मंठा मेडिकल असोसिएशन तर्फे घेण्यात आला.
या सेवा गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंठा येथील ज्येष्ठ डॉ विश्वासराव बागवे होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ डॉ व्ही. बी केंधळे, आणि साईनाथ पवार (अध्यक्ष आर डब्लू सी ए जालना) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्यासपीठावर रामेश्वर कोटकर, डॉ प्रभाकरराव कुलकर्णी, सुभाष जगताप, किरण बावस्कर, दिलीपराव जायभाये, डॉ बी जे काळे, डॉ सुनील सरकटे, डॉ श्रीधर भाग्यवान, डॉ विष्णुपंत जायभाये यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. ज्येष्ठ डॉ एच के शर्मा, डॉ पी एम शेंडगे, डॉ यु बी बोडखे, डॉ वी एस भगस, डॉ ए डी बोराडे, डॉ के के कमळकर, डॉ शिवाजीराव गणगे, दत्तप्रसाद झंवर, संजय छल्लाणी, यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने झाली. प्रास्ताविकात बोलताना मंठा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्याम काकडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात मागील तीस वर्षापासून सेवा देणार्या डॉक्टरांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले साईनाथ पवार यांनी तीस वर्षापासून डॉक्टरांनी कठीण परिस्थितीत दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानले व पुढेही आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो आणि भावी जीवनाबद्दल आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉ असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ बी जे काळे यांनी मेडिकल असोसिएशने राबवलेल्या या उपक्रमाची भरभरून स्तुती केली व आभार मानले तसेच या अनुषंगाने डॉ रमेश सूर्य यांनी आपल्या मनोगतातून वैद्यकीय सेवा देताना आलेल्या अडचणीवर मात करीत डॉक्टर्स अविरत परिश्रम घेतात, नागरिकांनी ही बाब समजून सहकार्य करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रदीप देशमुख यांनी केले तर आभार मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बोडखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेडिकल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी तथा पॅथॉलॉजी असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सायंकाळी 07 वाजता सुरू झालेल्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याचे स्नेहभोजन व कोजागिरी दुग्धपानानंतर कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.