जालना । प्रतिनिधी – चंदनझिरा अत्त्याचार प्रकरणातील आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केलीय. यावेळी आरोपीकडून पोलिसांनी घटनाक्रम जाऊन घेतला. चंदनझिरा येथे 9 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार घटनेच्या 20 तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी आदित्य जाधव यास ताब्यात घेतले होते. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. तांबोळी यांनी त्यास 18 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्या अनुषंगाने गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी चंदनझिरा पोलिसांनी आरोपी आदित्य जाधव यास सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.