स्थीर तसेच भरारी पथके कार्यरत – डॉ. गोरे विधानसभा निवडणुक; परतूर तहसील कार्यालयात पत्रकार परिषद

16

परतूर । प्रतिनिधी – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, 99, विधानसभा मतदारसंघ परतूर च्या वतीने दि.16/10/2024 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,पद्माकर गायकवाड, परतूर तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे, निवडणूक नायब तहसीलदार, कुलदिप कुळकर्णी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगा मार्फत दि.15/10/2024, रोजी दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्रातील 288 जागेसाठी चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.99 परतूर विधानसभा मतदारसंघाचा तपशील खालील प्रमाणे आहे. 99 परतुर विधानसभा मतदारसंघात समावेश तालुक्याची संख्या 03 आहे. परतुर, मंठा,जालना. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 320997, एवढी आहे.तर महिला मतदारांची संख्या 154019,व पुरुष मतदारांची संख्या 166978 एवढी आहे. मतदार संघात 85 वर्षावरील मतदारांची संख्या 5683, दिव्यांग मतदारांची संख्या 3199, एवढी आहे. परतुर विधानसभा मतदार एकूण मतदान केंद्राची संख्या 359 आहे. परतूर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त स्थीर पथकाची संख्या 04 आहे. आष्टी, नेर फाटा ,तळणी फाटा, साईबाबा चौक परतुर, मतदार संघासाठी नियुक्त भरारी पथकांची संख्या 05 आहे.उपरोक्त प्रमाणे 99 परतुर विधानसभा मतदारसंघाची व्याप्ती असून सदरील उमेदवार यांची अर्ज स्वीकृतीचा दि. 22/10/2024 ते दि.29/10/2024 हा असून छाननी दि.30/10/2024 आहे. व अर्ज परत घेण्याची दि.04/11/2024 हि देण्यात आलेली आहे. सदरील प्रक्रियेमध्ये मतदान दि.20/11/2024 रोजी घेण्यात येणार असून दि.23/11/2024 रोजी नवोदय विद्यालय आंबा तालुका परतुर येथे मतमोजणी राहील असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.