जालना । कुंडलिका नदीचे पुनर्जीवन या उपक्रमास CARD संस्था तांत्रीक सेवा देणार आहे. यावेळी CARD चे सचिव पुष्कराज तायडे यांनी गाव स्तरावर विविध जागृती अभियान आणि तांत्रीक सेवा बाबत मार्गदर्शन दि. 20 रोजी केले. चनेगाव, धामणगाँव, तूपेवाडी, बावणे, पांगरी, पठारदेऊळगाव, असोला, सिंधी, पिंपळगाँव, मानदेऊळगाव, चीतोडा मांडवा या अकरा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रोजगार सेवकांची गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी रोजगार हमी योजना अंतर्गतची कामे प्रस्तावित करुन परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सोबत बैठक आयोजित केली होती.
CARD चे कृषी तंत्रज्ञ अजय राठोड यांच्यासह ग्राम रोजगार सेवक संजय डोळसे, देविदास चव्हाण, श्रीमंत क्षीरसागर आणि इतर ग्रामपंचायतचे उपस्थित होते.