तरूणांनी दुरदृष्टी व सकारात्मक विचार करून उद्योग उभारावेत – के. डी. दांडगे

6

जालना । प्रतिनिधी – मिटकॉन प्रशिक्षण केंद्र जालना यांच्या वतीने जालना येथे आज दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी एक दिवशीय उद्योजकता विकास कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी के डी दांडगे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, जालना, व शेख शरीफ डोणगाव यांचें मार्गदर्शन लाभले. या वेळी प्रशिक्षणार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री दांडगे म्हणाले की तरूणांनी दुरदृष्टी व सकारात्मक विचार करून उद्योग उभारले पाहिजे त्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची त्यासाठी या प्रशिक्षणात बारकावे समजून सांगितले.या प्रशिक्षणात सौर ऊर्जा , विद्युत वाहणे,सायबर सुरक्षा,बंदीस्त शेळीपालन,कुकूटपालन,दुग्ध व्यवसाय, जैविक खते, रेशीम उद्योग, दालमिल,विटा तयार करणे, मसाला उद्योग,गृह उद्योग, कांडी कोळसा,शेती पूरक व्यवसाय या सोबत उद्योग संधी मार्गदर्शन, उद्योग प्रेरणा, संघटन कौशल्य, उद्योजकीय गुणसंपदा,व्यक्तीमत्व विकास, प्रभावी संभाषण कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, जागेची निवड, बाजारपेठ पाहनीतंत्र, शासकीय व निमशासकीय योजना, जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना,खादीग्राम उद्योगांच्या योजना, महामंडळाच्या विविध योजना, राष्ट्रीय पशुधन विकास योजना,प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे, बँकेची कार्यप्रणाली , विक्री व्यवस्था,भांडवल उभारणी ,मनुष्यबळ , विमा संरक्षण, शासकीय परवाने या विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी के डी दांडगे ,जिल्हा प्रकल्प अधिकारी मिटकॉन द्वारा पत्रकार भवन , एस पी ऑफीस जालना मो.9423730932 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.