घनसावंगी । प्रतिनिधी – भुमिहिन,कास्तकार, बेघरांसाठी अहोरात्र शासन व प्रशासनाशी मी झगडत असून वेळप्रसंगी न्यायालयातही मी भुमिहिनांसाठी खटले चालवित आहे. या आपल्या लढ्याला यश आले असून लवकरच आपल्या पदरी सातबारा उतारा पडेल, असेही शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख तथा भुमिहिन,कास्तकारांचे नेते अॅड. भास्कर मगरे म्हणाले. घनसावंगी येथील आयोजित करण्यात आलेल्या दलित आदिवासी भूमीहीन बेघर,निराधार मेळाव्यात संवाद साधतांना बोलताना होते. यावेळी तांडे,वाड्या, वस्त्यांमधून मोठ्या संख्येने भुमिहिन, कास्तकार, बेघरांसह विविध योजनेपासून वंचित असलेले नागरिक व महिलांची उपस्थिती होती.
आपण शिवसेना दलित आघाडीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई लढत आहोत. आपण कुठल्याही प्रकारे माघार घेतलेली नाही, प्रशासन, शासन दिलेल्या आदेशाची अंमलबवणी करत नसल्याने आपल्या सारख्या सर्वसामान्यांचा प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांवर प्रचंड रोष आहे. परंतु आपल्या लढाई रास्ता असून आपण ती पुर्णपणे जिंकणार असून लवकरच आपल्या पदरी सातबारा नक्कीच मिळेल, अशी ग्वाही शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे यांनी उपस्थितांना दिली.