महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23ला मतमोजणी; मुख्य निवडणुक आयुक्त यांची पत्रकार परिषदेत माहिती

27

नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणुक आयोगाने नवी दिल्ली येथे मंगळवार (दि 15) आयोजित पत्रकार परिषदेत केली. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौर्‍यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. 85 वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भातले कठोर निर्देश आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि इतर अधिकार्‍यांना दिल्या आहेत. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे.
महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. 20 नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख 22 ऑक्टोबर असेल तर 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर 2024 अशी असणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
व्होटर अ‍ॅपवर मतदार त्यांची माहिती तपासू शकतात. पैसे मद्य ड्रग्जच्या वाटपावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मतदान केंद्र 2 किलोमीटरच्या अंतर्गत असेल, मतदान केंद्रावर जाऊ न शकणार्‍या नागरिकांसाठी घरुन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्ण पणे पारदर्शकता बाळगण्यात येईल, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली, महाराष्ट्रात 9 कोटी 3 लाख मतदार आहेत. यापैकी 4 कोटी 93 लाख पुरुष तसेच 4 कोटी 60 लाख महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंघ 288 आहेत. त्यापैकी 25 अनुसूचित जाती तर 29 अनुसूचित जमीतीसाठी राखीव आहेत., महाराष्ट्रात 1 लाख 158 मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र आहेत., झारखंड आणि महाराष्ट्रात भेट घेतली. तिथे राजकीय पक्षांबरोबर इतरांशी चर्चा केली. तसेच निवडणुकीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे., मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या नागरिकांचं अभिनंदन आणि खूप खूप आभार. दोन्ही राज्याच्या लोकांनी जो उत्साह दाखवला आहे. तो कायमस्वरुपी लक्षात राहील. असे निवडणुक आयुक्त यांनी पत्रकार परिषदेच्या प्रारंभीच सांगीतले.