परतूर । प्रतिनिधी – परतुर विधानसभा मतदारसंघातील परतुर व मंठा शहरातील विकास कामांसाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. पुढे या पत्रकात म्हटले आहे की परतुर व मंठा शहरातील स्वामी समर्थ मंदिरासाठी सभा मंडप देण्याची अनेक दिवसापासून ची मागणी होती ती मागणी पूर्ण झाली असून परतुर येथील सभामंडपासाठी 50 लक्ष तर मंठा येथील सभामंडपासाठी 25 लाख रुपये प्राप्त झाले आहेत
परतूर शहरातील डॉ एपीजे अब्दुल कलाम शादी खाण्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला काय असल्याचे सांगितले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृह परिसरातील रस्ते बांधकाम व सुशोभीकरणासाठी 01 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी तर टेलिफोन भवन ते दिंडी मार्ग या रस्त्यासाठी परतूर शहरातील बालाजी मंदिर परिसरातील विकास कामांसाठी 20 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाले असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे
मंठा शहरातील मोहन शेठ यांच्या घरापासून तर मच्छिंद्र वाघमारे यांच्या घरापर्यंत 35 लाख रुपये सिमेंट रस्ता बांधकामासाठी, मंठा तळणी रोड ते माऊली मंगल कार्यालय सिमेंट रस्त्यासाठी 30 लाख रुपये, अशा प्रकारचा निधी मंजूर झाला असून पंधरा कोटीतील उर्वरित कामी खालील प्रमाणे परतूर शहरातील अग्निशमन दल ते बस स्थानक 01 कोटी 50 लक्ष, टेलिफोन भवन दिंडी मार्ग 1 कोटी 20 लक्ष रुपये, नाट्यगृह परिसरामध्ये रस्ते बांधकाम व सुशोभीकरणासाठी 01 कोटी 75 लक्ष, शादी खाना इमारत 25 लक्ष, परतूर शहरातील स्वामी समर्थ केंद्र येथे सभामंडपासाठी 50 लक्ष, अक्षय कुरकुटे यांच्या घरापासून रामा गवळी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता 50 लाख रुपये इंदिरा मंगल कार्यालय ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालय 30 लक्ष संतोष चव्हाण यांचे घर ते अनिल वाशिंबे यांचे घर सिमेंट रस्ता 20 लक्ष प्रशांत अग्रवाल यांचे घर ते विलास चव्हाण यांचे घर सिमेंट रस्ता 40 लक्ष राँग गल्ली रामेश्वर मंदिर प्रसाद राम गल्ली परतूर येथे रस्ता बांधकाम 20 लक्ष माने यांचे घर माने यांचे घर ते छल्लाणी जिनिंग पर्यंत रस्ता बांधकाम 30 लक्ष, जैनुद्दीन यांचे घर ते सुरणार यांचे घर सिमेंट रस्ता 20 लक्ष राजू भिसे यांचे घर ते आढे सर यांच्या घरापर्यंत 20 लक्ष रस्ता बांधकाम करणे गणपती मंदिर समोर सभा मंडप बांधकाम करणे 10 लक्ष रुपये नागोबा नागोबा मंदिर समोर सभा मंडप बांधकाम करण रुपये 10 रुपये
परतुर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सुशोभीकरण करणे 75 लक्ष रुपये सीतानंद पार्क सातवणकर आखाडा रस्ता बांधकाम करणे10 लाख रुपये संतोष चव्हाण यांचे घर ते अनिल वाशिंबे यांचे घर 20 लक्ष रुपये प्रशांत अग्रवाल यांचे घर ते विलास चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे 40 लक्ष रुपये यांचे घर ते रामा गवळी यांच्या घरापर्यंत सिमेंट बांधकाम करणे 50 लाख रुपये विशाल यंदे यांचे घर ते बी अँड सी कॉटर पर्यंत रस्ता करणे 10 लक्ष रुपये संतोष चव्हाण यांचे घर ते हिदायित खा यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे 15 लक्ष रुपये राम गल्ली येथे राम मंदिर परिसर रस्ता करणे 20 लक्ष रुपये धनंजय लिंबुळकर ते दिलीप अण्णा मगर यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम 10 सोनू अग्रवाल यांचे घर ते सुनील काळे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष रुपये पवार कॉलनी मधील मारुती मंदिर येथे सभा मंडप बांधकाम करणे 10 लाख रुपये पाचारे सर यांचे घर ते विकास खरात यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम 10 लक्ष रुपये, बस स्थानक जवळील मारुती मंदिर सभामंडप बांधकाम करणे 10 लाख रुपयांसह अन्य कामांचा समावेश आहे.
मंठा शहरातील स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित येथे 25 लक्ष रुपयाचे सभामंडप बांधकाम करणे मोहन शेठ यांचे घर तर मच्छिंद्र वाघमारे यांच्या घरापर्यंत 35 लक्ष रुपयांचे सिमेंट रस्ता बांधकाम करणे मंठा येथील तळणी मंठा रस्ता रोड ते राजू राठोड यांचे घर योगेश नाईक यांचे घर ते माऊली मंगल कार्यालय पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे 30 लक्ष रुपयांच्या कामांसह इतर कामांना मंजुरी मिळाली असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.