भाजपाकडून चंदनझिरा येथील घटनेचा निषेध

10

जालना । प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी च्या वतीने जालना येथील चंदनझिरा येथे एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर घटनेच्या निषेदार्थ संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाही करण्यासाठी भाजप जालनाकडून पोलीस अधीक्षक, जालना यांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा भागात काल रात्री काही नराधमांनी एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून मारहाण केल्याची घटना मनाला वेदना देणारी आहे. चंदनझिरा प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगराध्यक्ष अशोक पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विमल ताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, सतीश जाधव, संध्याताई देठे, शिवराज जाधव, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव, वसंत जगताप, सुहास मुंडे, सुनील पवार, संजय डोंगरे, सोमनाथ गायकवाड, बद्री भसांडे, दत्ता जाधव, महेश मुळे, कृष्णा गायके, योगेश लहाने, निवृत्ती लंके, बद्री वाघ, छबुराव राठोड, गंभीर पडोळ, अनिल सरकटे, शांतीलाल राऊत, सुनील तरासे, ऋषी आदमने, अरुण वाघ्रुळकर, शिवराम राजपूत, अशोक पारे आदींची उपस्थिती होती.