परतूर । प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, गणपती नेत्रालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, जालना आरोग्य भारती व कै. सुंदरराव ढेरे पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पारडगाव* यांच्या संयुक्त विद्यमाने पारडगाव येथे विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिर दि. 11/ 10/ 2024शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आले.. त्यामध्ये 95 जणांची नेत्र तपासणी, 48 जणांची रक्त तपासणी व 38 जणांची एउॠ तपासणी करण्यात आली. सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यात येवुन लाभार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
यावेळी डॉ. स्वप्नील बी. मंत्री महाराष्ट्र शासन नियुक्त सदस्य उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकिय मदत कक्ष, डॉ संदीप चोपडे, डॉ. सुधीर आंबेकर जिल्हा उपाध्यक्ष, आरोग्य भारती जालना, सरपंच गोरख जाधव, उपसरपंच शफी अहमद सय्यद, श्री गजाननराव ढेरे डॉ हरिप्रसाद ढेरे, डॉ कैलाश ढेरे, गणपती नेत्रालयाचे डॉ अनुकुमारी, डॉ वृंदा आंबेकर, संतोष नाईक, गणेश जूंगडे, महालॅबचे युनूस पठाण, बालाजी मुसळे, परमेश्वर ढेरे, भारत स्वामी शेख जावेद, जगन्नाथ ढेरे, डिगाबर शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.