तात्काळ विद्युत खांबे हटवा अन्यथा जनआंदोलन; जालना कृति समितीचा इशारा

11

जालना । प्रतिनिधी – शहरातील रेल्वे स्टेशन ते चमन पर्यंतच्या रस्त्याचे काम अपुर्ण राहिले आहे. तसेच या रस्त्यावर मध्येच विद्युत खांब, विद्युत डीपी आल्याने हा रस्ता नव्हे तर मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्यावरुन मार्गक्रमण करतांना नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील विद्युत खांब, रोहित्र (डीपी) तात्काळ हटवावी व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जालना कृति समितीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात विद्युत खांब न हटल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा ईशाराही कृति समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरात रेल्वे स्टेशन ते चमन पर्यंतच्या  रस्त्याचे काम अपुर्ण राहील्या कारणाने रोज विविध समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यास सार्वजनिक बाधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्मिता पवार, अभियंता श्री. नागरे हे जवाबदार आहेत. त्यांच्यासह बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र देणारे महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधीत अधिकारी हे देखील जवाबदार आहेत. यासंदर्भात विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी निवेदने दिलेली आहेत. जालना काँग्रेस अनुसुचित जाती जमातीच्यावतीने आंदोलनही करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हा विषय मार्गी लागलेला नाही. जनतेला न्याय मिळालेल नाही.
रेल्वे स्टेशन ते गांधीचौक या रस्त्याचे मागील सहा महिन्यापासून काम अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्यावर अनेक  अपघात होत आहे, रस्त्यामध्ये रोहित्र व वीजेचे खांब उभे आहेत. अशाच नुतन वसाहत भागात रस्त्यावरील खांबामुळे एका जेल पोलिसाचा मृत्यू झालेला आहे. रस्त्यावरील खांब बाजूला करण्यासाठी आयुक्त महानगरपालिका, कार्यकारी अभियंता, नियोजन विभाग टोलवाटोलवी करीत आहे. या बाबत अनेक निवेदने दिली परंतु उपयोग होत नाही.
नुतन वसाहत येथील पाण्याच्या टाकीत इसम मृत्यू मुखी पडून दूषित पाणी पुरवठा केला गेला. या टाक्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत हिन दर्ज्याची झालेली आहे. जनावरे सूध्दा टाकीच्या अवती भोवती जातात. त्यामुळे सदर टाकीला सेप्टी गेट व जाळ्या लावुन त्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. पाण्याच्या टाकीच्या आजुबाजुला अतिक्रमणे झालेली आहेत ती सुध्दा काढणे अत्यंत आवश्यक आहे,
जालना शहरातील लक्कडकोट, गांधी चौक, शनिमंदिर, अलंकार टॉकीज, सुभाष चौक, महावीर चौक, मम्मादेवी मंदिर या  भागातील वाहतूक संपूर्णपणे कोलमडलेली असून यावर पोलीस अधीक्षक, वाहतुक शाखा, मनपा आयुक्त यांना आदेश देऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी. या विभागात पोलीस कॉन्स्टेबल 12 तासा करिता असणे जरुरीचे आहे किंवा संबंधीत ठिकार्णी सिंग्नल लावण्याची आवश्यकता आहे.
जालना रेल्वे स्टेशन पासुन जे अन्न धान्य पुरवठा करण्याचे जे ठिकाण आहे ते हलविणे गरजेचे आहे कारण आऊट ऑफ डेट झालेले ट्रक्स या ठिकाणाहून जोरात व सुसाट चालतात त्यांना कोणतेही भान राहत नाही, त्यामुळे नेहमी त्या रस्त्यावर अपघात होतात, या अगोदर या रस्त्यावर सहा शाळकरी मुले मरण पावलेली आहेत. यावर सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे. महानगर पालिकेकडुन सुविधांच्या बदल्यात घेण्यात येणारी फी अव्वाच्या सव्वा वाढविलेली आहे ती सुध्दा कमी करण्याचीही मागणी कृति समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
या समस्यांचे निराकरण येत्या आठ दिवसात न झाल्यास जालना कृति समितीच्यामार्फत विविध सामाजिक संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल व होणार्‍या परिणामास प्रशासन जवाबदार राहणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
निवेदनावर दिनकर घेवंदे, रमेश देहेडकर, नंदकुमार जांगडे, राजेंद्र जाधव, जय खरात, रघुवीर गुडे, बाबसाहेब सोनकर, अनील साळवे, जावेद आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.