घनसावंगीतून निवडणूक लढवणार = सुनील आर्दड

32
कुंभार पिंपळगाव  – तालुका घनसांगी येथे आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत बोलताना भाजपा नेते माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांनी सांगितले की घनसावंगी मतदारसंघांमध्ये प्रत्येक बुध वर भारतीय जनता पार्टीचे मजबूत संघटन असून भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ मंडळींनी तसेच आपण स्वतः पक्ष विस्तारासाठी गेल्या 17 /18 वर्षापासून घनसावंगीत काम केले आहे त्यामुळे घनसावंगी मतदारसंघावर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रबळ दावा आहे व पक्षश्रेष्ठींकडे मतदारसंघ भाजपला सोडून घेण्यासाठी आपण शिष्टमंडळासह भेट घेऊन मागणी करणार आहोत असे त्यांनी सांगितले. मतदारसंघांमध्ये 250 शाखांची उभारणी आपण केलेली आहे .तसेच भारतीय जनता पार्टीने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रम मग तो मोदी @ 9, मतदारसंघातील 23 हजार लोकांना सरल ॲपवर आणण्याचे काम बुध पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी मजबुतीने केलेले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
         याप्रसंगी ज्येष्ठ नेते मुरलीधर पाटील चौधरी, प्रल्हाद नाना अर्दड ,शंकर मामा लहामगे, प्रदेश महामंत्री सर्जेराव दादा जाधव, अंकुशराव बोबडे, कैलास दादा शेळके, अभयसिंह गुजर ,रघुनाथ ताठे, यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भावना  व्यक्त केल्या व भारतीय जनता पार्टीला ही जागा सोडून घेऊन स्थानिक उमेदवार सुनील बापू आर्दड यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सर्वांनी सांगितले. जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारीसाठी कडाडून विरोध सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दर्शविला.
       सदरील बैठकीस मुरलीधर पाटील चौधरी, प्रल्हाद नाना आर्दड, सर्जेराव दादा जाधव, शंकर मामा लहामगे, अंकुशराव बोबडे, कैलास दादा शेळके, फारुख दफेदार, माजिदभाई पठाण,  रघुनाथ ताठे, अभयसिंह गुजर, परदेसी, एकनाथ महाराज राठोड, सुरेश राव उगले यांची प्रमुख उपस्थिती होती व पूर्ण मतदार संघातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.