मनाला ज्यांनी मित्र केले तेच महामानव ठरले !

19
जालना- जूना जालना येथील तक्षशीला बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संदिप खरात व प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री बुध्दाच्या चरणावरती विजया दशमी दिनी गीत संबोधी संदिप इंगोले हिने सादर केले तसेच सुशांत किशोर साळवे या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने इंग्रजीमध्ये भाषण सादर केले. कांबळे ताई व  साळवे यांनी बाबासाहेबांचे गीत सादर केले.डॉ प्राचार्य राजकुमार म्हस्के सर यांनी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, मनाला ज्यांनी मित्र केले तेज महामानव झाले.मनावर विजय प्राप्त करणारे तथागत गौतम बुद्धांनी मुक्तीचा संदेश दिला.येणाऱ्या पिढ्यानपिढ्या तारणारा एकमेव धम्म म्हणजे बौद्ध होय.मनाची श्रीमंती असावी लागते.धम्माचे पाईक धम्माचा विचार जे चालवतात  ते या जगाला न्याय देवू शकतात.
तदनंतर डॉ. सुशील सुर्यवंशी सर यांनी विचारात मनपरिवर्तन करण्याची शक्ती आहे.अंधश्रद्धा निर्मुलन आपण करायला पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी  प्रा.संभाजी कांबळे,सुधीर खंडारे,किशोर साळवे,संतोष तायडे,विशाल वाघमारे, छाया साळवे, शालिनी इंगोले, नलिनी खंडारे, चंद्रकांत वाघमारे, मीना शरणागत, कुलदीप गरड, डॉ. पगारे, प्रा गायकवाड मॅडम, डॉ पडगम मॅडम,सुप्रिया बगडे, ॲड.मगरे  मॅडम, अशोक दांडगे, आर.डी.झिने, कोंडिरांम पवार, आत्माराम सुखदाने, रमेश जाधव, बी. के. बोर्डे सर्व उपासक व उपसिका उपस्थित होते.