महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी संपुर्ण ताकद लावा – शेेखर घोडके; राजेंद्र जाधव यांना जालना विधानसभेची उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची मागणी

24

जालना । प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण ताकद लावण्याचे पार्टीचे जालना विधानसभा निरीक्षक शेखर घोडके यांनी येथे म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल आगामी दोन-चार दिवसांमध्ये केव्हाही वाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागलेले दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना विधानसभा निरीक्षक शेखर घोडके रविवार (दि 13) जालना दौर्‍यावर होते. यावेळी ते बोलत होते.
श्री घोडके यांनी जालना विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांना जालना विधानसभेची उमेदवार द्यावी अशी मागणी निरीक्षक घोडके यांच्याकडे उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केली. राजेंद्र जाधव यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित असल्याचा दावा देखील या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत निरीक्षक घोडके यांनी पक्षश्रेष्ठींकडे जालना विधानसभेतील विषय मांडणार असल्याचे सांगून वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल तो निर्णय-आदेश सर्वांनी पाळावा तसेच येणार्‍या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावावी असेही उपस्थिती पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री घोडके म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना युवक शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी जालना विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढत असल्याचे सांगितले तसेच आमदार राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, नंदकिशोर जांगडे यांच्या माध्यमातून जालना शहरात पक्ष संघटन वाढविण्यासाठी पक्षातील प्रत्येक पदाधिकारी- कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. पदाधिकारी-कार्यकर्त्यांची ही मेहनत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिलीच आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही पक्ष आदेश देईल त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील उमेदवाराच्या प्रचारासाठी जीवाचे रान करून आम्ही सर्व काम करू असे आश्‍वासन श्री जाधव यांनी निरीक्षक श्री घोडके यांना दिले. शेवटी किशोर कांबळे यांनी आभार मानले.
यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख फारूक, ज्येष्ठ नेते तय्यब देशमुख, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धानोरे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष हरीश कांबळे, शहर उपाध्यक्ष जमीर, युवक उपाध्यक्ष गणेश वाघमारे, राम देवकर, रेखाताई तौर, डॉ. सोनवणे, गोकुळ स्वामी, किशोर कांबळे आदींची उपस्थिती होती.