परतूर – येथील इंदिरा मंगल कार्यालय,येथे परतुर व मंठा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभेचे नियोजित उमेदवार राम प्रसाद थोरात यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. तीस वर्षाचा राजकारणातील दांडगा अनुभव असलेले उमेदवार आहेत. यामुळे त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये अधिकृतरित्या मनमाड येथे प्रवेश केला आहे, यावेळी परतुर तालुका,परतुर शहर, मंठा तालुका, कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा भव्य-दिव्य असा सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या परखड भूमिकेमुळे व ओ.बि.सी.समाजाला व बहुजन समाजाला तेच न्याय देऊ शकतात असं ठाम मत झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी मध्ये आलो असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.मी जर निवडून आलो तर वंचित समाजाचे इमानदारीने काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले, पुढे म्हणाले परतूर मतदारसंघांमध्ये शिक्षणाची फार मोठया प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे,व केवळ रस्ते बनविणे, नाल्या बनवणे म्हणजे विकास नाही. उत्तम दर्जाचे शिक्षण, आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे दीपक डोके, डॅा.किशोर त्रिभुवन,श्रीकांत राठोड, परमेश्वर खरात,शिवाजी डोळस, चोखाजी सौंदर्य, देवीदास कोळे,गौतम खंडागळे राजेंद्र वांजुळे, परमेश्वर पोटे,
रोहन वाघमारे यांची उपस्थिती व हाजारो कार्यकर्ते उपस्थित होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, परतूर तालुका अध्यक्ष रवी भदर्गे, परतूर शहराध्यक्ष राहुल नाटकर,प्रदीप साळवे,प्रशांत वाकळे, मनोज वंजारे, दीपक हिवाळे यांनी अतोनात प्रयत्न केले. सूत्रसंचालन राहुल नाटकर यांनी केले तर आभार मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनी मानले.