जालना । खरीप पणन हंगाम-2022-23 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत राज्य शासनाने भरडधान्य (ज्वारी,बाजरी व मका) खरेदी करण्यासाठी उत्पादक शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असुन,ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती. परंतु सदर नोंदणी करिता शासनाने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
तरी भरडधान्य (ज्वारी,बाजरी व मका) नोंदणी करिता ज्या शेतक-यांचा 7/12 आहे.त्याच शेतक-यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही.त्यामुळे ज्या शेतक-यांना शेतमाल विक्री करावयाचा आहे,त्याच शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करीता प्रत्यक्ष हजर राहुन लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.