अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई लवकरच मिळणार – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती

4

जालना । प्रतिनिधी – अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकर्‍यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बार्बीकरिता देखील मदत देण्यात येते. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सदस्य पावसामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई देखील लवकरच मिळेल अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली
केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणार्‍या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत्त अनुज्ञेय करण्यात आली आहे. अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली
ऑगस्ट व सप्टेंबर, 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर किंवा सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संध्याकाळी मिळावी यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी पत्रव्यवहार करून व्यक्तीश: भेट घेऊन मागणी केलेली होती जिल्हाभरात 6 लाख 38 हजार 797 एकर चे झाले नुकसान झालेले असून त्यासाठी सुमारे 412.30 कोटी रुपये नुकसान भरपाई ची मागणी करण्यात आली असून भरपूर व मंठा तालुक्यात झालेल्या नुकसान भरपाईसाठी 88.89 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती लोणीकरांनी दिली.
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार हे सर्वस्वी शेतकर्‍यांना समर्पित असे सरकार असून शेतकर्‍यांच्या अडीअडचणीच्या काळात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे त्यामुळे मागील काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा सततच्या पावसामुळे जे नुकसान झाले असेल त्याची नुकसान भरपाई शासनामार्फत लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
मंठा तालुक्यातील 61530 तर परतुर तालुक्यातील 45459 अशा एकूण 106989 शेतकर्‍यांनी पिक विमा मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली आहे तसेच तालुक्यातील 107547 शेतकर्‍यांनी भरलेला असून त्यामध्ये 66 हजार 134 हेक्टर जमिनीचा पिक विमा काढण्यात आलेला आहे भरपूर तालुक्यातील 84 हजार 552 शेतकर्‍यांनी 54 हजार 470 हेक्टर एवढा पिक विमा काढलेला आहे अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.