जालना । प्रतिनिधी – पोलीस ठाणे सदर बाजार जालना हद्दीत नवरात्र सणानिमित्त पेट्रोलीग करीत असतांना सदर बाजार पोलीसा ठाण्याच्या डिबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार महात्मा फुले भाजी मार्केट जालना या ठिकाणी काही चोरांनी विद्युत ट्रासफार्मर (डि.पी.) चोरी करीत आसतांना त्यांनी तेथील वॉचमेनला मारहाण केली आहे.
विद्युत ट्रासफार्मर (डि.पी.) चोरी करणारे चोर हे उतारगल्ली काद्राबाद जालनाच्या दिशेने पळाले आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथक त्यादिशेने जावून चोराचा पाठलाग केला असता पळालेल्या चोराने पोलीसांच्या दिशेने दगडफेक सुरु केली. तेव्हा पोलीसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने गल्ल्या बंद करुन दोन चोरांना उतारगल्ली काद्राबाद जालना येथून ताब्यात घेतले. ईतर दोन चोर पुन्हा तेथुन पुढे पळुन गेले. त्यांचा पाठलाग करीत असतांना ते दोन चोर अमरछाया टॉकीज उडपी चौकाजवळील घरावर लपुन बसले. त्यांना देखील स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या चोरांकडे प्राथमिक चौकशी केली असता ते जालना शहरात विद्युत ट्रासफार्मर (डि.पी.) चोरी करण्याकरीता आले असल्याचे समजले. हारुन ईस्माईल कुरेशी (वय 32 वर्षे) रा. सिलीखाना बडा तकीया, छत्रपती संभाजीनगर, अर्जुन प्रितीसिंग कलाणी, (वय 38 वर्षे), रा.भरतनगर, नवीन मोंढ्याच्या पाठीमागे, जालना, जितुसिंग संतोषसिंग टाक (वय 33 वर्ष) रा. अलाना ता.जि. छत्रपती संभाजीनगर, किसनसिंग रामसिंग टाक (वय 31 वर्षे) रा.व्दारकानगर, जालना असे चोरट्यांची नावे आहेत. त्यांचे आणखी दोन जोडीदार पळून गेले आहेत. महात्मा फुले भाजी मार्केट, जालना येथील मारहाण झालेल्या वॉचमनला बोलवुन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे कलम 310 (02),303 (02) भारतीय न्याय संहिता सह कलम 04/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे रविवार (दि 6) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि श्रीमती शिंदे करीत आहेत.
या कारवाईत एक स्कार्पिओ, एक विद्युत ट्रासफार्मर (डि.पी.) व एक धारदार खंजीरसह एकुण 9 लाख पन्नास हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांना विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी यापुर्वी सुध्दा सदर बाजार हददीतील जुनी एमआयडीसी/पावरलूम येथे चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस निरीक्षक उनवणे, तालुका पोस्टे, डी.बी पथक प्रमुख पोउपनि भगवान नरोडे, पोहेकॉ जगन्नाथ जाधव, पोहेका धनाजी कावळे, पो नजीर पटेल, पोका.दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, चालक सपोउपनि शेख व कल्पेश पाटील यांनी पार पाडली आहे.