घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे आवाहन; बदनापूर मतदार संघातील पदाधिकार्‍यांची बैठक

5

जालना । प्रतिनिधी – आगामी निवडणुकीत उमेदवार कोणीही असो. परंतु आजच्या घडीला आपला उमेदवार केवळ मशाल आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण विरोधकांनी चोरला. पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर हे चिन्ह सर्वच नागरिकांना माहीत नसल्यामुळे आपल्या मतावर परिणाम झाला. तर आमचे धनुष्यबाण हे चिन्ह समजून नागरिकांनी मतदान केल्याने विरोधकांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे आता मशाल चिन्ह हे प्रत्येक मतदारापर्यंत जाणे आवश्यक आहे. आज रोजी आपला उमेदवार ठरलेला नाही परंतु आपले चिन्ह मशाल हे समजून प्रत्येकाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले.
बदनापूर मतदारसंघातील पदाधिकार्यांची महत्वाची बैठक शिवसेना भवन येथे शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभाग प्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हासंघटक भानुदास घुगे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, तालुकाप्रमुख अशोकबर्डे, कैलास चव्हाण, बाबुराव पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, पुढे बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे हे मागील अनेक वर्षांपासून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहेत. पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह गेले तरी त्यांनी हिम्मत न हारता नव्या जोमाने पक्ष बांधणी केली पक्ष उभा केला. सोयाबीन, कपाशी यासह शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, सामान्य नागरिकांना न्याय मिळावा त्यांचे प्रश्न सोडले जावेत यासाठी ते सातत्याने धडपडत असुन सामान्य नागरिकांसाठी सातत्याने ते लढत आहेत. येत्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या जागा निश्चित वाढणार असून सत्तांतर अटळ असल्याचे ते म्हणाले. पक्षाच्या जास्तीत जागा याव्यात यासाठी उद्धवजी ठाकरे हे सातत्याने राज्यभर फिरून लोकांशी संवाद साधत असल्याचेही जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सांगितले. आगामी नवरात्रीच्या चार दिवसात बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गट निहाय मशाल यात्रेचे नियोजन करण्यात आले. सर्वांपर्यंत मशालचिन्ह पोहोचविण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी या बैठकीत केला. यावेळी माजी आमदारसंतोष सांबरे म्हणाले की, आगामी विधान सभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती बदनापूर-अंबड विधान सभामतदार संघावर शिवसेनेंचा झेंडा फडकायचा असेल तर शिवसैनिकांनी तण,मन,धनाने काम करुन प्रत्येक घरात व माणसांपर्यंत शिवसेनेचे मशाल चिन्ह पोहोचवावे, असे आवाहन सांबरे यांनी केले.
यावेळी कुमार रूपवते,भरत सांबरे,दिनेश काकडे, श्रीराम कान्हेरे, जगन दुर्गे, रामेश्वर फंड, केशव क्षीरसागर, गजानन सानप, कल्याण टकले, मुकुंद हुसे, सिद्धेश्वर उबाळे, अर्जुन ठोंबरे, रामभाऊ मसलेकर, राजेंद्र गव्हाड, फारूक पठाण, अनिस पटेल, फैजान मिर्झा,सगीर सिद्दिकी, संजय जाधव, परमेश्वर चंद, ज्ञानेश्वर गरबडे, तपन पडघन, विकास करतारे, नितीन कोलते, निंबाजी क्षीरसागर, कैलास भुजंग, जावेद खान, शैलेश दिवटे, राहुल गिरी,सुरेश राठोड, राजू पवार, कृष्णा पवार, मिर्झा अल्ताफ बेग, मिर्झा अशपाक बेग, मिर्झा गालिब बेग, शिवाजी गव्हाड, कल्याण जाधव, संजय कोळेकर, नाना ओळेकर, बंडू फंड, हरून पटेल, अभिषेक फंड, विठ्ठल फंड, बाबासाहेब ओळेकर, कृष्णा ओळकर, धर्मा ओळेकर, सुखदेव दाभाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थिती होते.