परतूर । प्रतिनिधी – परतुर येथील कायमस्वरूपी रहिवासी मुस्लिम समाज असून आम्हाला व्हाट्सप व विविध सामाजिक माध्यमातून व्हिडिओ प्राप्त झाले आहेत.दि.29 सप्टेंबर 2024 रोजी लोहिया नगर गाजियाबाद येथील हिंदी भावनात एका सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती उपस्थित होते. या कार्यक्रमात महंत येती यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यांनी म्हटले की आता तर असे असे अपराधी जन्माला आले आहेत की त्यांच्यासमोर रावणाची पण अस्तित्व नाही. जर जाळायचं असेल तर आज सर्व हिंदूंना मंचावरून आव्हान करतो जर जाळायचं असेल तर प्रत्येक दसर्याच्या दिवशी मोहम्मद ला जाळा. मग पहा आपल्या लाखो करोडो बहिणी लेकीचा बलात्कार ज्या व्यक्तीच्या कारणाने तो आहे अरब चा लुटेरा मोहम्मद सर्व देशात खून खराबा होत आहे तो आहे दरिंदा मोहम्मद जर जाळायचे असेल तर मोहम्मद चे पुतळे जाळायला सुरुवात करा असे केल्यास मोहम्मदच्या बार्यात बोलले जाईल. या व्यक्तिव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे कारण गेल्या काही काळात काही समाजविरोधी घटक वारंवार आमच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करत आहेत. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मद यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ते सर्व मानवजातीसाठ शांती करुणा आणि सत्याचा संदेश देणारे आहेत. त्यांच्या जीवनाचे आदर्श जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणादायी आहे येती नरसिंहानंद सरस्वती यांनी जाणीवपूर्वक आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि समाजात द्वेषनिर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तणाव वाढविण्याचे षडयंत्र रचले आहे. यावेळी मुक्ती कदीर शेख. मुक्ती जहीर फारुकी.ड.महेंद्र बेडेकर.ड. इंतेजार अन्सारी. रहमदिन कुरेशी. नसीर चाऊस मोईन कुरेशी. शेख अहमद. शेख अमजद. अजित भाई सौदागर.यामुळे यती महंत वर कारवाई करण्यात यावी यासाठी परतूर येथील पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.यांच्या निवेदनावर सह्या आहेत.