टेंभुर्णी – मातृशक्ती ही संस्काराचा पाया आहे . जीवनामध्ये पहिले गुरू, ईश्वरानंतर कोणी असेल तर ते म्हणजे आई-वडील आहे .त्यामध्ये सगळ्यात मोठं काम जर कोणाचा असेल तर ते आईच आहे. आणि म्हणून संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम हे मातृशक्ती करत असते. असे प्रतिपादन ह.भ.प.नारायण महाराज पिंपळे (गुरुजी) यांनी श्रीक्षेत्र डावरगाव देवी ता. जाफराबाद या ठिकाणी सुरू असलेला नवरात्र उत्सव जगतमाता जगदंबा मातेच्या मंदिर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये शुक्रवारी ता.4 झालेल्या कीर्तन रुपी सेवेतून केले.
डावरगाव देवी येथील जगत माता जगदंबा माता जागृत देवस्थान भव्य दिव्य मंदिराच्या परिसरामध्ये नित्यनेमाप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते .याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सुंदर असे वातावरणामध्ये श्रीक्षेत्र डावरगाव देवी या ठिकाणी सुरू आहे. त्यामध्ये सप्ताहातील दुसर्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा ह.भ. प. नारायण महाराज गुरुजी यांच्याकडे होती. महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचा !!संत समागम एखादीये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण !घडेल भोजन उचिष्टांचे!! या अभंगावर चिंतन केले!!
आज विज्ञान युगामध्ये खरी गरज जर कशाची असेल तर संगतीची आहे. संस्काराची आहे. आज जर सुसंस्कार पिढी जर घडली तरच उद्याच भविष्य चांगले असणार आहे. आणि हे संस्कार घडण्याचे पहिले केंद्र जर कोणते असेल तर ते आई वडील आहे. आजच्या काळामध्ये आई-वडिलांना संस्कार क्षम मुले बनवणे हे काळाची गरज आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त जर मुलांसोबत जर कोणी राहत असेल तर ती आई . आणि म्हणून मातृशक्ती आई तुळजाभवानी माता .आई जगदंबा माता जर कोण असेल तर आजची मातृशक्ती आहे. आणि मातृशक्तीच आपल्या मुलांना चांगले उत्तम संस्कार देऊ शकते. जेणेकरून तो भविष्यामध्ये चांगला माणूस होईल आज विज्ञान युगामध्ये अधिक काही संपत्ती कमावण्यापेक्षा उत्कृष्ट सुंदर चांगलं व्यक्तिमत्त्व कमवणे गरजेचे आहे .आणि म्हणून आज संस्काराची गरज आहे . जगद्गुरु तुकोबाराय सांगतात !!तुका म्हणे सर्व सुख त्या संगती!! घडेल पंगती संतांचीये !!
जगामधले सर्व सुख जे काही असेल ते संतांच्या, चांगल्या व्यक्तीच्या ,श्री गुरुच्या संगतीत आहे .आणि म्हणून आपल्याला चांगली संगत असली पाहिजे. संगत जर चांगली असेल तर पंगतही चांगली मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं संत वचन आहे त्या संत वचनाचा एक गाथा मधील 221 क्रमांकाचा अभंग घेऊन सुंदर असं निरूपण या ठिकाणी महाराजांनी मांडलेले आहे. या कीर्तनामध्ये गायनाची साथ करण्याकरता ह.भ.प.कोमल महाराज जोशी ह.भ.प.कृष्णा महाराज, ह.भ.प.अनिल महाराज देव्हडे(गायनसम्राट) ह.भ.प.निवृत्ती महाराज कोरडे(कीर्तनकार)त्याचबरोबर मृदंगाची साथ देण्याकरता ह.भ.प.प्रमोद सहाने महाराज, ह.भ.प.विठ्ठल महाराज, हे होते तर टाळकरी विणेकरी त्या टाळकरी मध्ये ह. भ .प. बबन महाराज चव्हाण, ह.भ.प. संतोष महाराज चव्हाण, ह.भ.प.सुखदेव महाराज पिंपळे ह.भ.प. राजु महाराज गिरी, ह.भ.प.भगवान महाराज चव्हाण, ह.भ. प. विनायक महाराज चव्हाण ह.भ. प.बाला साहेब पिंपळे,ह.भ.प. सुभाष महाराज पिंपळे, ह.भ.प.एकनाथ महाराज कोरडे.सारंगधर महाराज गिरी,आदींनी कीर्तनामध्ये साथ दिली . कीर्तनासाठी दगडुबा देठे, त्याचबरोबर सखाराम नवले, शंकर लहाने , प्राचार्य विलास नवले , लक्ष्मण देठे, दिनकर नवले, दत्तु देठे, गजानन नवले व सर्व गावकरी उपस्थीत होते.