जालना । प्रतिनिधी – शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून ते जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी ,शेतकरी सेना, व शिवसेनेच्या सर्व अंगीकृतर संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते गटप्रमुख प्रमुख बुथ प्रमुख यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानिमित्ताने 8 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मामा चौक जालना येथे सकाळी 10.00 वाजता संवाद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. डॉ. खा. श्रीकांत शिंदे हे प्रथमच जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने त्यांचे भव्य असे स्वागत करणे आपले आद्यकर्तव्य असून त्यामुळे आपण आपल्या भागातील कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, शेतकरी बांधव, महिला भगिनींनी या संवाद मेळाव्यास व स्वागत सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित जालना विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दरम्यान मार्गदर्शन करताना केले.
भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावर शनिवार (दि 5) संवाद मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात प्रमुख शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर, शैलेश घुमारे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख कालींदाताई ढगे, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सविता किवंडे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, गणेश सुपारकर, उपशहरपमुख लक्षण अवघड, युवा सेनेचे योगेश रत्नपारखे, दीपक वैद्य, अल्पसंख्यांक सेलचे जाफरखान, शेख नजीर, तालुकाप्रमुख भगवान अंभोरे, राहुल गवारे, किशोर पांगारकर, गोपी गोगडे, संतोष जांगडे, राजू माधवाले, दिनेश भगत, निखिल पगारे, संजय डुकरे, कांता रांजणकर, मनोज लाखोले, शिवसिंग तिलवारवाले, संतोष शिकारे, दीपक राठोड, शिवाजी शेळके, संदीप वाघ, सखाराम लंके, निवृत्ती कुलकर्णी, मुसा परसुवाले, सतीश गायकवाड, लक्ष्मीबाई भुताडा, उज्वला फोपलीया, अॅड. अशफाक पठाण, बबनराव मगरे, शुभम टेकाळे, विजय जाधव, मेघराज चौधरी, लक्ष्मण सुपारकर, नागेश ढवळे, राधाबाई वाडेकर, दुर्गाताई देशमुख, सविता भोसले, आशा पवार, आशा कोळी, वंदना शहाणे, विमल शिंदे, कृष्णा डोंगरे, संदीप साबळे, रवी जाधव, सागर पाटील, महिंद्र मनसेवार, सौरभ भिसे, भूषण बनकर, अरुण काकडे, दीपक हवाले, लखन कणसे, शाहबाज खान, आकाश जगताप, माधव जाधव, माधव गायकवाड, सखाराम इंगळे, उत्कर्ष जोशी, विशाल जगधने, चंद्रशेखर निर्मल, फिटर खंदारे, भोला कांबळे, सुशिल भावसार, नेल्सन कांबळे, जीवन हातागळे, राजू गायकवाड, राजू पवार, अंकुश गायकवाड, किशोर शिंदे, घोडे पाटील, लक्ष्मण चव्हाण, सखाराम इंगळे, अंकुश शितोळे, भरत पिंपळे, हसराज बटावले, नीरज मंत्री, कृष्णा पांडव, सुनील साळवे, सुनील रत्नपारखे, भागवत गिराम, कुणाल जाधव, ज्ञानेश्वर लाकडे, संदीप घारे, तुकाराम लकडे, नरसिंग गोरे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी देखील मार्गदर्शन केले.