जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली शासकीय विश्रामगृहाची पाहणी

6

जालना – महामहीम राज्यपाल महोदयांच्या जालना जिल्हा नियोजित दौर्‍याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहाला भेट देत पाहणी केली. तसेच विश्रामगृहातील सुरक्षा, शयन कक्ष, खोलीतील प्रकाश व्यवस्था, स्वयंपाकघर, भोजन कक्ष, वीज, पाणी, स्वच्छतेचे निरीक्षण करुन सर्व व्यवस्था चोख ठेवण्याच्या संबंधित अधिकार्‍यांना सुचना केल्या. यावेळी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.