काँग्रेस इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती

14

जालना । प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत पाठक मंगल कार्यालय मुक्तेश्वर द्वार जुना जालना येथे पक्ष निरीक्षक खा. डॉ. शोभाताई बच्छाव या घेणार आहेत असे काँग्रेस पक्षाच्या वतीने एका पत्रकाद्वारे कळविले आहे .
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निरीक्षक खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव घेणार असून, याप्रसंगी खासदार डॉ. कल्याणराव काळे जालना लोकसभेचे निरीक्षक डॉ. पी .सी. शर्मा जिल्हा प्रभारी माजी आ. नामदेवराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख , जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले आहे.