सहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या परतूर नगरपालिकेच्या इमारतीचे भूमिपूजन राज्यातील सर्वात विकसीत मतदार संघ करण्याचा उद्देश ठेवून सदैव कार्यरत – आ. लोणीकर

5

परतूर । प्रतिनिधी – परतुर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून महाराष्ट्र राज्यात सर्वात विकसित मतदार संघ तयार करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली 35 वर्ष अविरत सातत्याने प्रयत्न करत असल्यामुळे मी राजकारणात आजही खंबीरपणे टिकून उभा आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
परतुर येथे सहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या महानगरपालिकेच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आणि दहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परतुर महानगरपालिकेच्या दोन ठिकाणच्या इमारतीतून महानगरपालिकेचा कारभार चालत होता. त्या इमारती खूप जीर्ण झाल्याने पावसाळ्यात गळत होत्या. परतूर शहरातील महानगरपालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे आणि सुरळीत चालावा याकरिता भव्य दिव्य इमारत बांधण्याची माझी संकल्पना होती. त्याकरिता मी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून सहा कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून सदरील इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने मनाला समाधान वाटत आहे.
गोरगरीब मागासवर्गीय समाजाच्या मुली शिकल्या पाहिजे त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता आलं पाहिजे याकरिता मी परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठा शहरात आणि परतूर शहरात प्रत्येकी दहा कोटी रुपये किमतीचे भव्य वस्तीग्रह निर्माण होण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून आणला असून परतूर शहरातील या आंबा रोडवरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या वस्तीग्रहाचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभल ही समाधानकारक बाब असल्याचे प्रतिपादन सुद्धा आमदार लोणीकर यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परतुर महानगरपालिकेत आपली सत्ता नसतानाही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहाकरता 17 कोटी परतूर शहरातील उड्डाण पुलाकरता 45 कोटी कोर्टाच्या इमारती करीता 25 कोटी, परतूर शहरातील स्मशान भूमी करीता 15 कोटी. परतूर शहरातील रस्त्या करीता 400 कोटी निधी राज्य सरकार च्या माध्यमातून आणला असून परतूर महानगर पालिकेवर भाजपा ची सत्ता आल्यास पाचशे कोटी रुपये निधी आणून गल्लो गल्लीत मजबूत टिकाऊ सिमेंट रस्ते बांधणार असल्याचे आवर्जून आमदार लोणीकर या वेळी म्हणाले. या प्रसंगी भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश सचिव राहुल बबनराव लोणीकर भिक्षु सर्जेराव जाधव शिवाजी पाईकराव प्रजापती शत्रगुण कणसे संपत टकले सुदामराव प्रधान रमेश भापकर भगवानराव मोरे दया काटे प्रवीण सातोणकर संदीप बाहेकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण इजरान कुरेशी मुज्जू कायमखानी राजेंद्र मुंदडा अमर बगडिया जगदीश झंवर प्रकाश दीक्षित संतोष हिवाळे, विजय यादव, जिजा शिंदे, गजानन लोणीकर, मलिक कुरेशी, शहाजी राक्षे, प्रमोद राठोड, बालाजी सांगुले, बंडू मानवतकर, नरेश कांबळे, डॉक्टर सुधीर आंबेकर, सखाराम कुलकर्णी नामदेव वायाळ, सोपान जैद, सचिन काटे, अर्जुन पाडेवार संजय भालेराव भगवान कांबळे इंद्रजित भालेराव मधुकर मोरे विलास पाडेवार कैलास साळवे संतोष हिवाळे शाहूराव मुंढे संतोष कोळे कृष्णा भदरगे सखाराम कोळे संतोष शेजूळ, तहसीलदार प्रतिभा गोरे, गट विकास अधिकारी तांगडे, महानगरपालिकेचे मुख्याधिकारी उकिरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटील, कनिष्ठ अभियंता सोनी, सगरुळे.