मनपा पथविक्रेता समितीवर धनसिंह सुर्यवंशी

6

जालना । प्रतिनिधी – येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत, पथविक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे तसेच हॉकर्स जॉईंट एक्शन कमिटीचे मराठवाडा अध्यक्ष धनसिंह प्रतापसिंह सुर्यवंशी यांची शहर महानगर पालिकेच्या पथविक्रेता समितीवर स्विकृत (नामनिर्देशित) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक संतोष एम. खांडेकर यांनी ही निवड केली आहे.
पथविके्रता अधिनियम 2014च्या कलम 11(4), 12, 13 अन्वये शहर पथविक्रेता समितीची नुकतीच निवडून पार पडली होती. या निवडणुकीनंतर या समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून श्री सुर्यवंशी यांची निवड झाली आहे. श्री सुर्यवंशी यांनी पथविक्रेत्यांसाठी लढा दिला आहे. भाजीपाला विक्रेते, फळविक्रेता, हातगाडी धारक यांच्या समस्या ह्या शासन-प्रशासन दरबारी मांडण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची समितीवर निवड करण्यात आली. निवडीबाबतचे प्रमापपत्र मनपाच्या उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, पं. दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानाचे शहर अभियान व्यवस्थापक विजय सांगळे यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवडीबद्दल शहर मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह श्री सुर्यवंशी यांचे मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, फॅब रनर्स गु्रपचे अर्जुन जगताप, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संदीप खरात, वकिल संघाचे अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, व्यापारी महासंघाचे सचिव अ‍ॅड. ईश्‍वर बिल्होरे, हॉकर्स जॉईंट अ‍ॅक्शन कमिटीचे राकेश निर्मळ, इम्रान मिर्झा, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षीरसागर, जय बजरंग फाऊंडेशनचे विपुल राय, रोहीत नलावडे, महाराणा ब्रिगेडचे सुखलालसिंह राजपुत, कालुसिंह राजपुत, दीपक शेळके यांच्यासह शहरातील व्यापारी, नागरिक, पथविक्रेत्यांनी अभिनंदन केले आहे.