जालना । प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष विधानसभेच्या जागेसाठी आपआपला दावा करत आहे. त्यातच महायुतीत आता जालना विधानसभेसाठी भाजपाने दावा केला आहे. भाजपा हि जागा लढल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वासही पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला. जालना मतदार संघातून भास्कर दानवे यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव घेत तो ठराव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यासाठी यांची बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत जालना विधानसभा भारतीय जनता पार्टी ला सोडल्यास उमेदवार म्हणून भास्कर दानवे यांचे नाव जाहीर केले. तर जालना विधानसभा मतदार मतदारसंघातून भाजपचा विजय निश्चित असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी व्यक्त केले. जालना विधानसभेसाठी भास्कर दानवे यांना उमेदवारी देण्याचा एक मुखी निर्णय भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठराव घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविला आहे.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजपा जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, सिद्धिविनायक मुळे, भागवत बावणे, कपिल दहेकर, बाबासाहेब कोलते, महानगर उपाध्यक्ष धनराज काबलीये, वसंत शिंदे, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, अर्जुन गेही, शिवराज जाधव, मनोज बिडकर, सुमित सुरडकर, बबनराव सिरसाठ, सखुबाई पणबिसरे, श्रीकांत शेलगावकर, पांडुरंग पोहेकर, कैलास उबाळे, संजय डोंगरे, बाबुराव भवर, अनिल सरकटे, दिपाली बिन्नीवाले, सिद्धेश्वर हसबे, प्रमोद गंडाळ, प्रभुलाल गोमतीवाले, सुदर्शन काळे, इम्रान सय्यद, डोंगरसिंग साबळे, सोमेश काबलिये, अभिजित अंभोरे, अमन मित्तल, रोहित नलावडे, सुधाकर खरात, रवि कायंदे, निवृत्ती लंके, नागेश अंभोरे, दत्ता जाधव, शारदा काळे, वंदना ढगे, सागर वाहूळकर, करण झाडीवाले यांच्यासह जि.प., पं.स. सदस्य, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.