राज्यस्तरीय ज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

15

जालना । प्रतिनीधी – महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर 2024 दरम्यान पंढरपुर जि. सोलापुर येथे ज्युनीयर राज्य टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 सोमवार रोजी निवड चाचणीचे आयोजन शिशु विहार इंग्लिश स्कुल, जालना येथे सकाळी 10 वाजल्यापासुन करण्यात आलेले आहे.
सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होणार्या खेळाडुंचा जन्म दि. 01/04/2006 या नंतरचा असावा. निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. सदर निवड चाचणीतुन 6 मुले व 6 मुलींची निवड करण्यात येईल व हे खेळाडु राज्यस्तर स्पर्धेत जालना जिल्ह्याचे नेतृत्व करतील. टेनिक्वाईट हा खेळ शालेय स्पर्धांमध्ये सहभागी असुन दहावी व बारावीत असणार्या खेळाडुंना गे्रस मार्क तथा शासकीय व निमशासकीय आरक्षणास पात्र आहे.
अधिक माहितीकरीता संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, जिल्हा प्रशिक्षक उमेश खंदारकर, गोवर्धन वाहुळ, तुषार गर्जे, अमोल सातपुते, संतोष वाघ, नितीन जाधव, शेख समीर, सोहेल खान, श्रीमती किरण पाटील, यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष नगरसेवक जयंत भोसले, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेसी, सुभाष पारे, श्रीमती सुनीता गवई, श्रीमती वैशाली सरदार, श्रीमती महेजबीन शेख, श्रीमती गिता संगम जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालना व जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.