जालना । पवित्र दीपावली सणानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सणास लागणारी दैनंदिन गरजेची खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांकडूनच करावी असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी केले आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ( ता. 19) प्रसिद्धीस दिलेल्या पञकात राजेश राऊत यांनी म्हंटले आहे, जालना शहर हे मराठवाड्यासह विदर्भ आणि महाराष्ट्रात नावाजलेली मोठी व्यापार पेठ असून दरवर्षी शहर ग्रामीण भागासह पर जिल्ह्यातील नागरिक येथे खरेदी साठी येतात. असे नमूद करत राजेश राऊत म्हणाले, गत दोन- तीन वर्षांपासून सर्वञ ऑनलाईन खरेदीचे फॅड वाढले आहे. ही स्थानिकांसाठी धोक्याची घंटा असून दिपावली निमीत्त कपडे, पादञाणे, टि. व्ही,फ्रीज,मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोने- चांदी,दागिने, अशा सर्व वस्तू खरेदी करतांना ऑनलाईन खरेदीस फाटा देऊन स्थानिक विक्रेते आणि व्यापारी यांना प्राधान्य द्यावे कारण आपल्या खरेदी मुळे, दुकानदारासह दुकानात काम करणारे मजूर अशा कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून त्यांना दोन पैसे मिळून त्यांची दिवाळी गोड होईल. याचा गांभीर्याने विचार करावा. असे भावनिक आवाहन राजेश राऊत यांनी केले.