सिद्धार्थ महाविद्यालयात वाणिज्य व नियोजन मंडळ व सामाजिक शास्त्र मंडळांचे उदघाटन

4

जाफ्राबाद । प्रतिनिधी – सिद्धार्थ महाविद्यालयात वाणिज्य व नियोजन मंडळ तथा सामाजिक शास्त्र मंडळांचे उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील डॉ. कैलास त्रिभुवन हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते व प्रा.डॉ. मोहन वने हे देखील उपस्थित होते वाणिज्य व नियोजन मंडळ व सामाजिक शास्त्र नियोजन मंडळाचे उद्घाटन पर भाषणामध्ये विद्यापीठातील शैक्षणिक विभागाचे डॉ. कैलास त्रिभुवन म्हणाले की, प्रत्येक महाविद्यालयामध्ये वाणिज्य व नियोजन मंडळाचे उद्घाटन करणे गरजेचे आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाणिज्य व नियोजन मंडळ व सामाजिक शास्त्र मंडळ विषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळते ते पुढे म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये वाणिज्य शाखेला मोठी मागणी प्राप्त झालेली आहे कारण वाणिज्य शाखेच्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्योजक तथा उद्योग उभे राहिले जातात. व एक उद्योजक अनेक व्यक्तींना रोजगार निर्माण करून देत असतो त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होते. अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मोहन वने म्हणाले की विद्यार्थ्यांनी दररोज कॉलेजमध्ये उपस्थिती राहुन महाविद्यालयातील विविध सुविधाचा फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष दिले पाहिजे महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध आहे या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. र. तु. देशमुख म्हणाले की, सध्याच्या स्थितीमध्ये वाणिज्य शाखेमध्ये विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. संजय साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. मनोज पगारे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका मनियार एस .आर. यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.