जालना । प्रतिनिधी – जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गणेश महाडिक यांनी आज पदभार स्वीकारला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेवून श्री. महाडिक यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
यापूर्वी श्री महाडिक यांनी सन 2011 ते 2017 या कालावधीत सिंधुदूर्ग येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तर सन 2017 ते 2020 या कालावधीत त्यांनी परळी येथे उपविभागीय अधिकारी तर सन 2020 ते 2024 या कालावधीत लातूर येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), तसेच हिंगोली येथे जानेवारी ते ऑकटोबर 2024 मध्ये उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणुन काम केले आहे.
पदभार स्वीकारल्या नंतर श्री. महाडिक म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.