टेंभूर्णी – ज्यांच्या नावातच झुंज देऊन समाजास जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे त्याचं वर्तमापत्राद्वारे वंचित, शोषित घटकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात हे पाहता खरचं झुंजार जनता काम हे नावाप्रमाणेच झुंजार असल्याचे प्रांजळ मत डॉ. पूजा पिसे यांनी लोकप्रिय दैनिक झुंजार जनता च्या वर्धापदिनानिमित्त आयोजित सन्मान कर्तृत्वाचा, सत्कार सोहळा मान्यवरांचा या शाही समारंभात त्या आपल्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, अतिशय कमी वेळात वाचकांच्या पसंतीस उतरलेले हे दैनिक आपली लोकशाहीत भूमिका स्पष्ट बजावत आहे हे पाहून समाधान वाटते आहे. या वर्तमान पत्राचे मुख्य संपादक इस्माईल शेख साहेब आणि त्यांची सर्व टीम यांच्या प्रामाणिक कार्यामुळेच आज हे वर्तमान पत्र राज्याच्या अतिशय कानाकोर्यात गेले आहे. कार्यक्रमाची सुरुवात मुफ्ती अब्दुल रहमान अशरफी यांनी कुराण पठण करून केली, तर अध्यक्षीय भाषणात राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकारिता करणे, एखादे वर्तमान पत्र चालवणे हे एवढे शक्य काम नाही पण इस्माईल शेख यांनी अतिशय कष्ट आणि मेहनतीच्या बळावर हे वर्तमान पत्र सूरू करुन त्यांचे सातत्य टिकून ठेवले हीच फार महत्त्वाची बाब असल्याची त्यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर इथे असलेल्या पत्रकारांनी सुद्धा आपली लोकशाहीतील भूमिका महत्त्वाची कशी आहे हे समजून घेऊन पत्रकारिता क्षेत्रात योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच या वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त उद्घाटनाचा मान एका महिलेला देऊन इस्माईल शेख यांनी समाजास एक वेगळा संदेश दिला असल्याची आवर्जून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उद्घाटक श्रीमती पूजा पिसे, प्रमुख उपस्थिती अब्दुल रहमान अशरफ़ी, विकास जाधव, केशव पाटील जंजाळ, इंद्रजीत भैय्या देशमुख, गणेश ठाले, इमरान कुरेशी, एडवोकेट डी एस जाधव, अंकुश पाटील, नीलम उद्योग समूहाचे इकबाल शेख,आसेफ अबरार खान,फरमान कुरेशी, अंकुश जाधव, दिलीप कड पाटील, जी टी वाघ, सर्व प्रतिनिधी वार्ताहर व मित्रपरिवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचालन असलम शाह यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य संपादक इस्माईल शेख यांनी तर आभारप्रदर्शन सागर घोडके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य… प्रवीण दळवी, भूषण चव्हाण, दिनेश पडोळ गुणाजी चाकोते, मारुती कुडकेवार, सुनील मारकल, पठाण फिरोज खान अक्रम खान, अरुण डाखोरे यांनी केले तर आयोजन समिती मध्ये इस्माईल शेख, सागर घोडके, संतोष डवरे, आकिब शेख फ़िरोज़ पठान, अक्रम खान आदींचा सहभाग होता.या निमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली त्या मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात असलम शाह, संजय माझळकर, राजू बुलबुले, ड. सय्यद इर्शाद शादुल पटेल… आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी झुंजार जनता या वर्तमान पत्रात उत्कृष्ट पत्रकारिता केल्या बद्दल आकिब शेख, सागर घोडके, संतोष डवरे, गुणाजी चाकोते, मारोती कुडकेवार , सुनिल मारकळ आदींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याबद्दल त्यांचे नऊवारक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष त आदर्श शिक्षक शेख जमीर सर, प्रसिद्ध चित्रकार संतोष बाबुराव औटी, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची जाफराबाद तालुका अध्यक्ष शेख अशपाक, उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, विनोद कळंबे, नसीम शेख, आदींनी अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमात सूत्र संचालन करणारे असलम शाह यांनी आपल्या बहारदार आणि काव्य मैफिलीचा साज चढवत सूत्र संचालन करत उपस्थिताची मने जिंकली हे विशेष.