जालना । प्रतिनिधी – महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती जालना येथील ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय येथे दि 02 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी करण्यात आली.
ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगावकर व नूतन विद्यालयाचे शिक्षक व वाचनालयाचे वाचक माधव ढाकणे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मनोगत व्यक्त करतांत माधव ढाकणे म्हणाले कि, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे देशाच्या जडण घडणीत मोलाचे योगदान आहे. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी महात्मा गांधीजींनी सत्य,अहिंसा ही दोन शत्रे दिली. शेतकरी आणि सैनिक हेच भारताचे सुरक्षण आणि संवर्धन करू शकतील यावर लालबहादूर शास्त्री यांनी कटाक्ष टाकलेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले तर उपस्थितचे आभार शैलेंद्र बदनापुरकर यांनी मानले. याप्रसंगी धोंडीराम पाजणकर, जयपाल सिंग रावत, बद्रीप्रसाद सोनी, शाहीर बाबुसेवा राठोड, प्रतिमेश शेलगावकर, कीर्ती पुराणिक, अश्विनी भाले, वल्लभ शेलगावकर यासह वाचकवर्ग उपस्थित होता.