घनसावंगी । प्रतिनिधी – मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे आंतर महाविद्यालयीन विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत जालन्या चा संघ विजयी.मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे मुलींच्या अंतर महाविद्यालयीन विभागीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न: छत्रपती संभाजी नगर, बीड ,धाराशिव जालना संघाने नोंदविला सहभाग,विद्यापीठाचा संघ तयार प्रतिनिधी घनसावंगी: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संचलित मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे अंतर महाविद्यालयीन विभागीय महिलांच्या कबड्डी स्पर्धा दिनांक 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य डॉ भागवतराव कटारे हे होते अध्यक्षस्थानी प्राचार्य भारत खंदारे हे होते. विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी उद्घाटन पर भाषणात प्राचार्य डॉ भागवत राव कटारे म्हणाले की मनुष्याच्या जीवनामध्ये खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असून खेळामुळे माणूस शारीरिक सुदृढ तर होतोच परंतु मानसिक सुद्धा मजबूत होतो तसेच या मातीतून विविध खेळाडूंनी आपले नावलौकिक केलेला आहे. खेळ ही एक संस्कृती असून खेळ भावना मनात ठेवून खेळाडूंनी समर्पण भावनेने खेळ खेळावा खेळातूनच सामाजिक एकतेची सांस्कृतिक, विविधतेची व राष्ट्रीय एकात्मतेची भावना खेळाडूंमध्ये निर्माण होते व राष्ट्रांमध्ये सुद्धा राष्ट्रीय भावना व एकात्मतेची शिकवण खेळ भावनेतून निर्माण होते. यश अपयश जय पराजय हा खेळाचा भाग आहे. ग्रामीण भागात सुद्धा प्रतिभावान खेळाडू आहेत आणि मुलींच्या या कबड्डी स्पर्धेमुळे निश्चितच घनसावंगी तालुक्यातील क्रीडा क्रीडा नव चालना मिळेल. आज खेळाडूंना व्यावसायिक व राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तथा विविध लीगमध्ये नावलौकिक प्राप्त करता येऊ शकतो. जीवनामध्ये चैतन्य व आनंद निर्माण करण्यामध्ये खेळाची भूमिका मोलाची आहे. देशाची प्रगती सुद्धा खेळा वरती अवलंबून आहे असे ते म्हणाले.यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांनी सांगितले की या मुलींच्या विभागीय कबड्डी स्पर्धा आयोजना बरोबरच विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून करण्यात येणार आहे.क्रिकेट, कबड्डी, कुस्ती तसेच इतर खेळाडूंना साठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न आहेत अत्यंत प्रेरक विचार त्यांनी प्रस्तुत केले. अध्यक्षीय भाषणात डॉ भारत खंदारे यांनी खेळ व खेळाविषयी आपले विचार स्पष्ट करत या विभागीय स्तरावरील आयोजना बाबत कौतुक केले. प्राचार्य डॉ रामराव चव्हाण यांनी सांगितले की ग्रामीण विद्यार्थिनींच्या खेळ विषयक भावनेला गती मिळेल व अशा आयोजना मुळे क्रीडा संस्कृतीस बळकटी प्राप्त होईल इतका मोठ्या स्वरूपात आयोजन याबाबत करण्याची संधी विद्यापीठाने माननीय कुलगुरू महोदयांनी दिली त्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी डॉ भगवान सिंग बैनाडे, सिनेट सदस्य प्रा नाना गोडबोले, माजी नगराध्यक्ष राज देशमुख, डॉ बप्पासाहेब मस्के शारीरिक शिक्षण विभाग अभ्यास मंडळ सदस्य,,डॉ प्रशांत तौर डॉ भुजंग डावकर डॉ डॉ अभिजीत दिक्कत, डॉ सुरेश नलावडे विद्यापीठ निवड समिती सदस्य, डॉ वरकर डॉ लक्ष्मण जाधव पंच, योगेश गायके, डॉ आर पी.राठोड डॉ पाथरे पंच व निवड समिती सदस्य,डॉ अनिल पाटील, डॉ अरुणा दसपुते, संघ व्यवस्थापक, डॉ संध्या जगताप, डॉ भीमा माने, डॉ विजय लक्ष्मी मुंडे सह पत्रकार सुभाष बीडे, संपादक श्री नरेंद्र जोगड पोलीस ,सह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी क्रीडा प्रेमी उपस्थित होते. यावेळी बीड छत्रपती संभाजी नगर धाराशिव व जालना या संघादरम्यान दोन-दोन राऊंड झाले व अंतिम सामना हा जालना विरुद्ध बीड या दोन संघादरम्यान झाला अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात जालना संघाने बीड संघाचा पराभव केला व विभागीय मुलींच्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले कडक ऊन असतानाही वातावरणात दमट असतानाही खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत सर्वांची मने जिंकली पंच प्रशिक्षक त्यांनी मोलाची भूमिका बजावली. शेवटी विद्यापीठाचा संघ ही निवड समितीने निवडला. सूत्रसंचालन डॉ कन्नूलाल विटोरे व डॉ बाळासाहेब सोनवणे यांनी आभार डॉ सुनील तांगडे तथा प्रा खंडू नवखंडे यांनी मानले कार्यक्रमाचे साठी डॉ ज्ञानेश्वर खोजे डॉ भीमराव पूंडगे, प्रा भागवत गोरे,डॉ ऋषी बाबा शिंदे, प्रा.बाळासाहेब वरखडे ,डॉ संभाजी मराठे, श्री गणेश सुरासे, श्री नेमिनाथ मुळे,श्री आकाश कुरळे, विश्वजीत खोजे, ,अर्जुन साबळे ,गणेश तरगे आदींनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.