मंठा । प्रतिनिधी – मतदारसंघातील हजारो गोरगरीब निराधार विधवा दिव्यांग परित्यक्ता दुर्धर आजारग्रस्त यांना अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला असून या सर्व गोरगरीब निराधार बंधू भगिनींच्या आशीर्वाद सातत्याने माझ्या पाठीशी आहेत त्यामुळेच मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो असताना देखील सरपंच पदापासून आमदार व राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारू शकलो माझ्या या यशामध्ये निश्चितपणे या सर्व बंधू भगिनींचा आशीर्वाद सातत्याने माझ्या पाठीशी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.
मंठा येथील माऊली मंगल कार्यालय येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजुरी आदेश वाटप बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ बालकांना पेन्शन मंजुरी आदेश वाटप तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मंठा तालुक्यातील सह्याद्री लोकसंचालित साधन केंद्र मंठा व मातोश्री रमाई लोकसंचालित साधन केंद्र तळणी यांच्या अंतर्गत येणार्या महिला बचत गटांना 2 कोटी 50 लाख रुपयांच्या कर्ज मंजुरी आदेशाचे वाटप आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले त्याचप्रमाणे कृषी कार्यालय मंठा या ठिकाणी एकात्मिक कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य विकासासाठी विशेष कृती योजना अंतर्गत 1100 फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना यांच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगार कष्टकरी कुटुंबातील तसेच दारिद्र रेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक विधवा दिव्यांग परित्यक्ता दुर्धर आजारग्रस्त निराधार यासारख्या 806 लाभार्थ्यांना माजीमंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने आज मंजुरी आदेशपत्राच वाटप करण्यात आले यावेळी काही प्रकरणे प्रलंबित असून त्या प्रलंबित प्रकरणांना देखील तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला दिल्या.
बाल संगोपन योजनेअंतर्गत मंठा तालुक्यातील 88 अनाथ बालकांना प्रति महिना 2200 पेन्शन मंजूर करण्यात आली असून 18 प्रस्ताव नव्याने दाखल करण्यात आले आहेत यामध्ये ज्या मुला मुलींना आई नाही किंवा वडील नाही किंवा आई-वडील दोन्ही नाहीत अशा अनाथ बालकांना त्यांच्या शिक्षणाचा उपजीविकेचा खर्च भागवता यावा यासाठी प्रति महिना 2200 रुपये पेन्शन महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येते परतुर विधानसभा मतदारसंघात 300 पेक्षा अधिक लाभार्थ्यांचा व्यक्तिशः आमदार बबनराव लोणीकर यांनी शोध घेतला असून या सर्व मुला मुलींना ही पेन्शन प्रत्यक्षात सुरू करण्यात आली आहे या अनाथ मुलांसाठी माझ्या आयुष्यात मी काहीतरी करू शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की भारत देश हा एक कृषिप्रधान देश असून शेती करत असताना शेतकर्यांना विविध अवजारांची किंवा उपकरणांची सतत गरज पडते. शेतकर्यांना अवजारांची पूर्तता होईल या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार कृषि विभागांतर्गत शेतकर्यांसाठी वारंवार नवीन योजना राबवत असते.याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे असेही आमदार लोणीकर यावेळी म्हणाले
शेतकर्याचे पीक जोमात येते. शेतकर्यांना शेती करताना विविध अवजारांची गरज भासत असते. यात अवजारातून शेतकरी शेती पिकांसाठी शेतात मेहनत घेतात. त्याचबरोबर सध्या रासायनिक खतांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच सेंद्रिय खतांचा देखील शेतकरी वापर करतात. कीड अळीसाठी शेतकर्यांना पिकावर फवारणी करावी लागते. त्यासाठी शेतकर्यांना फवारणी पंपाची गरज आता शेतकर्यांना बॅटरी फवारणी पंप 100% अनुदानावर दिला जातो आहे. असेही तुम्ही शेतकर्यांसाठी ही योजना कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर राबवण्यात येत असून शेतकर्यांना या योजनेअंतर्गत बॅटरी पंप आणि स्प्रे पंप यासाठी 100% अनुदान दिले जात आहे. शेतकर्यांना आता 100 टक्के अनुदानावर बॅटरी पंप मिळत असल्यामुळे शेतकर्यांची शेतीतील कामे लवकर होणार आहेत. या पंपाच्या माध्यमातून शेतकरी जलद गतीने पिकावर फवारणी करू शकतील असा विश्वास यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला
यावेळी गणेशराव खवणे संदीप भैया गोरे पंजाबराव बोराडे नागेशराव घारे गजानन देशमुख विठ्ठलराव काळे उद्धवराव गुंडगे दत्ताराव कांगणे विलास घोडके प्रसादराव गडदे उपविभागीय अधिकारी श्री पद्माकर गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी श्री रोडगे गटविकास अधिकारी श्री गगनबोने तालुका कृषी अधिकारी श्री राजबिंडे महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री उमेश कहाते नायब तहसीलदार श्री काळदाते नायब तहसीलदार श्री कुलकर्णी दारासिंग चव्हाण गणेश चव्हाळ माऊली गोडगे कैलास चव्हाण नवनाथ खंदारे राजेभाऊ खराबे बाळासाहेब तौर सोपानराव वायाळ महेश पवार सोनाजी जाधव अन्साबाई राठोड जयश्री पवार नगरसेविका छाया वाघमारे आशामती लहाने लता राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी केले तर प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री गगनबोने यांनी केले.