विष्णू ढवळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

35

परतूर । प्रतिनिधी – जालना जिल्हा परिषदेच्या उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शिक्षकांना शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा प्राथमिक गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या परतूर या शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढवळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि कला शिक्षक या गटातून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. परतूर तालुक्यात प्राथमिक गटातून विष्णू ढवळे, माध्यमिक गटातून अनिल माणकेश्वर आणि कला शिक्षक गटातून विलास जाधव यांना
पुरस्कार जाहीर झाले आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दया काटे, भगवानराव मोरे, रमाकांत बरीदे, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश राठोड यांच्या वतीने मुख्याध्यापक विष्णू ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.