शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत ईबीके उर्दु शाळेच्या शिक्षकांनी पटकावले पारितोषिक

4

टेंभुर्णी । प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनातर्फे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध वर्गांचे आणि विविध विषयांचे गट सहभागी झाले होते.
शिक्षकांना शिकवण्याचे व्हिडीओ बनवून सरकारला पाठवावे लागले. या स्पर्धेत तालुका स्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 5,20,000 शिक्षक सहभागी झाले होते.
जाफराबाद तालुका स्तरावर सेठ ई बी के उर्दु विद्यालयाचे तीन शिक्षकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि तिघांना ही यश आले.
गयास महेमूद शेख यांनी विषय गणितमध्ये – वर्ग 1ली 2री,च्या गटात प्रथम क्रमांक मिळविले, समीर मुर्तुजा सय्यद यांनी विषय परिसर अभ्यास वर्ग 3री ते 5वी च्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला, तर साबेरोद्दीन नूरोद्दिन शेख यांनी विषय सामाजिक शास्त्र वर्ग 6वी ते 8वी च्या गटात प्रथम क्रमांक पट कावला. विशेष म्हणजे तालुक्यातील विजयी पाच शिक्षकांपैकी तीन शिक्षक हे ई बी के उर्दू विद्यालयाचे आहे. तिन्ही विजयी शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव नंदलाल काबरा, कोषाध्यक्ष प्रेमसुख काबरा, संचालक ठमाजी भागवत, उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख मुख्याध्यपक एस आर शेख, संचालक मंडळ तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले.