किड्स चॅम्पियन राष्ट्रीय स्पर्धेत ओवी मांगडे हिला सुवर्णपदक

25

जालना । प्रतिनिधी – नाशिक येथे 20 ते 22 सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या पहिल्या किड्म चॅम्पीयन ऑफ चॅम्पीयन राष्ट्रीय स्पर्धेत जालना येथील एम. डी. स्पोर्टस अकॅडमीची खेळाडू ओवी अनिल मांगडे हिने 9 वर्ष वयोगट व 25 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत देशभरातून 500 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या यशाबद्दल अकॅडमीचे प्रशिक्षक आणि संचालक ज्ञानेश्वर मोरे, वडील अनिल मांगडे आई गीता मांगडे, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, सचिव सचिन आर्य, प्रशिक्षक मयुर पिवळ, सचिन गादेवाड, प्रतिक ढाकणे, आकाश उघडे, शरद जाधव, श्री तुळजा भवानी माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष राम महाराज शिंदे यांनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.