जालना । प्रतिनिधी – जालना विधानसभा मतदारसंघातील सावरगाव रामनगर येथे असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपस्थितांना सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल सोप्या पद्धतीने समजावून सांगितले व मी आणि माझे शिवसैनिक सामान्य जनतेच्या सुख-दुःखात नेहमी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वासही यावेळी श्री खोतकर यांनी पक्षप्रवेश करणार्यांना दिला.
याप्रसंगी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, संजय बप्पा शेजुळ, किसनराव डवले, कृष्णादादा डोंगरे, बापुराव राजे जाधव, तालुका प्रमुख भगवानराव अंभोरे, युवासेनेचे दोन्ही तालुका प्रमुख नागेश डवले पाटिल , राहुलभाऊ गवारे, साळेगावचे सरपंच संदिप घारे, सिरसवाडी सरपंच रवींद्र ढगे, विष्णुपंत ढोकळे, राजेभाऊ शेजुळ, नाथा सोनुने, सुनिल कांबळे, सलमान कुरेशी, गणेश डवले यांची उपस्थिती होती.
प्रवेश करणार्यांमध्ये मधुअण्णा शिंदे, आबा काकडे, विठ्ठल श्रीखंडे, सुधाकर शिंदे, जना अहिरे, उदावंत कृष्णा, सचिन शिंदे, शिवाजी गाडेकर, आबा खांडेभराड, गंगाधर गोरे, गोवर्धन गायकवाड, दशरथराव मोजपुरी यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.