जालना । प्रतिनिधी – शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वंतत्र कायमस्वरुपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करुन घेण्याबाबत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना, जिल्हा जालना च्या वतीने आज (30) जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन करुन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात शेवटपर्यंत मागण्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी उमेद संघटनेतील संगीता घोडके, संगीता शिंदे, मीना कठोरे, सुनीता कठोरे, गणेश तिडके, माया हुसेके (भोकरदन) सुनिता चव्हाण (घनसावंगी) अलका काढवदे (अंबड) यांच्यासह भाजप जिल्हासरचिटणीस सिद्धिविनायकजी मुळे, तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, निवृत्ती लंके, गोवर्धन कोल्हे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.