परतूरात काँग्रेसच्या परिवर्तन पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद

6

परतूर । प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अनेक दिवसापासून बालासाहेब आकात हे परिवर्तन पदयात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक गाव वाडी वस्ती तांडा येथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. बालासाहेब आकात यांच्या नेतृत्वात परतूर तसेच मंठा येथे काढण्यात आलेल्या भव्य परिवर्तन पद यात्रेला विधान परिषद आमदार राजेश राठोड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनवर देशमुख, सोनाजी बोराडे, शरदराव बोराडे, प्रकाश घुले तसेच काँग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार संघातील जनेतेचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी ही पदयात्रा सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी विरोधात मतदारसंघातील जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याचा निर्धार जनतेने केला आहे, परिवर्तन निश्चित घडणार अशी प्रतिक्रिया बालासाहेब आकात यांनी दिली आहे. ग्रामीण भागात या पदयात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण तापलेले असताना काँग्रेसकडून उमेदवारीचा दावा करणार्‍यामध्ये बालासाहेब आकात हे मराठा उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार मानले जात आहे.